‘फूड डिलिव्हरीबॉय’च्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 19:55 IST2022-08-29T19:54:40+5:302022-08-29T19:55:14+5:30
Nagpur News ‘फूड डिलिव्हरी’ करणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तुकडोजी महाराज चौकाकडून वंजारीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.

‘फूड डिलिव्हरीबॉय’च्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नागपूर : ‘फूड डिलिव्हरी’ करणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तुकडोजी महाराज चौकाकडून वंजारीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.
राजेंद्र मोहनलाल जैस्वाल (५२, हनुमाननगर) हे रविवारी दुपारी जेवण झाल्यानंतर एका कामानिमित्त घराबाहेर पडले. मोटारसायकलने ते तुकडोजी महाराज चौकाकडून वंजारीनगरकडे जात असताना सलमान सलिम शेख (३१, टीचर्स क्वॉर्टर, नागपूर विद्यापीठ, अंबाझरी मार्ग) हा ‘फूड डिलिव्हरी’ करणारा तरुण दुचाकीने रॉंग साईडने आला व त्याने जैस्वाल यांना धडक दिली. शेखची दुचाकी वेगात असल्याने या धडकेत जैस्वाल खाली पडले व त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटदेखील निघाले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. संबंधित तरुणाने त्यांना मेडिकलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मुलगा अनिकेत जैस्वाल याला अपघाताची माहिती देण्यात आली. अनिकेतने यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शेखविरोधात गुन्हा नोंदविला आहे.