शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

नागपुरात  दोन गटात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:57 PM

कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देहुडकेश्वर ठाण्यात दोन्हीकडून तक्रारी : ११ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणारे आणि शिरपूरकर परिवारात गेल्या काही दिवसांपासून पारिवारिक वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, कीर्ती शिरपूरकर त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी आल्याच्या मुद्यावरून रविवारी रात्री दोन्ही परिवारातील सदस्य समोरासमोर आले. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपी राहुल लोणारे (वय ३०), परेश दिलीप लोणारे (वय २६), छोटू दिलीप लोणारे (वय २४), दिलीप लोणारे (वय ५५), कीर्ती शिरपुरकर (वय ३२), भाग्यश्री राहुल लोणारे (वय २६) यांनी वाद घालून महालमध्ये राहणारे सतीश लोणारे यांना, त्यांची वृद्ध आई तसेच नातेवाईकांना मारहाण केली. सतीश यांची ही तक्रार असताना राहुल मनोहर लोणारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या दुकानात बसून असताना आरोपी पुष्पा लोणारे (वय ६७), सतीश लोणारे (वय ४०), अमित लोणारे (वय ४०), अशोक शिरपूरकर (वय ४०), दिनेश शिरपूरकर (वय ४०) आणि त्यांच्या साथीदारांनी राहुल यांच्याशी वाद घातला. एवढेच नव्हे तर त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून दुकानातील माठ, कांच तसेच अन्य साहित्याची तोडफोड केली. दोन्हीकडून मिळालेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याच्या आरोपाखाली दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. पुरुष मंडळींना अटक करण्यात आली तर, महिलांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर