नागपूर : जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा मोठा परिणाम गुरुवारी सराफा बाजारावर दिसून आला. बुधवारी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेले सोने आणि चांदीचे भाव गुरुवारी अनपेक्षितपणे कोसळले. एकाच दिवसात सोन्याच्या दरात ७ हजार रुपयांची, तर चांदीत तब्बल ३२ हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव ३ टक्के जीएसटीसह १,५८,१०० रुपये आणि प्रति किलो चांदी २,६३,१६० रुपयांपर्यंत कमी झाली. नागपूर हे सोन्याच्या व्यापाराचे मोठे केंद्र असल्याने, अचानक झालेल्या या घसरणीमुळे सराफा बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने दर कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना घेता येईल. मात्र, बाजारातील ही अस्थिरता पाहता गुंतवणूकदार आता ‘वाट पाहा आणि मगच खरेदी करा’ अशी भूमिका घेताना दिसत आहेत.
जीएसटीसह सोने-चांदीच्या भावाचा तक्ता :
दिनांक सोने चांदी२ फेब्रु. १,५३,७८० २,७२,८५०३ फेब्रु. १,५५,८५० २,६९,४५०४ फेब्रु. १,६५,१०० २,९५,७००५ फेब्रु. १,५८,१०० २,६३,१६०
Web Summary : Gold and silver prices unexpectedly crashed after reaching record highs. Gold fell by ₹7,000, and silver plummeted by ₹32,000. The price drop offers some relief to customers with the wedding season approaching, but investors are advised to wait and watch due to market volatility.
Web Summary : रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचने के बाद सोने और चांदी की कीमतों में अप्रत्याशित रूप से गिरावट आई। सोने में ₹7,000 और चांदी में ₹32,000 की गिरावट आई। शादी के मौसम के साथ कीमतों में गिरावट से ग्राहकों को कुछ राहत मिलती है, लेकिन निवेशकों को बाजार की अस्थिरता के कारण इंतजार करने और देखने की सलाह दी जाती है।