शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:37 IST

दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.

ठळक मुद्दे१ एप्रिलपासून होणार लागू : अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.रस्ता अपघातात दुचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १६ मार्च २०१६ रोजी ‘एबीएस’ किंवा ‘सीबीएस’ प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून दिल्या होत्या. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर काही राज्यात ही प्रणाली राबविण्यात आली. आता १ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ही प्रणाली बसविणे अनिवार्य होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वाहन डीलर्सला २०२० पर्यंत जुन्या ब्रेक प्रणालीची सर्व वाहने विक्रीस काढावी लागणार आहे.काय आहे ‘एबीएस’ प्रणालीजुन्या वाहनांमध्ये असलेला ब्रेक दाबल्यास चाक ‘लॉक’ होऊन वाहन घसरण्याची भीती असते. परंतु ‘एबीएस’मुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्यता अधिक असेल किंवा गाडी उलटल्यास या यंत्रणेमुळे अपघात टाळणे शक्य होते. १२५सीसी इंजिनवरील नव्या वाहनांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.अशी आहे ‘सीबीएस’ प्रणालीअनेक वाहन चालक आपल्या अनुभवानुसार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एकाचवेळी दाबतात. यामुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. परंतु प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होत नाही. यासाठी ‘कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टीम’ आली आहे. ही प्रणाली लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करीत असल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता कमी होते. ही यंत्रणा १०० ते १२५ सीसी इंजिनच्या सर्व नव्या दुचाकी वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे.उत्पादित दुचाकींसाठी अनिवार्य१ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ‘सीबीएस’ किंवा ‘एबीएस’ प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीलर्सला ३१ मार्च २०२० पर्यंत जुन्या ब्रेकची दुचाकी वाहने विक्रीस काढावी लागणार आहेत.उमेश पाटणीसदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन

टॅग्स :bikeबाईकRto officeआरटीओ ऑफीस