रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्या करणारे मध्यप्रदेश, बिहारमधील भामटे जेरबंद

By नरेश डोंगरे | Published: April 4, 2024 08:10 PM2024-04-04T20:10:40+5:302024-04-04T20:10:49+5:30

एकाच दिवशी तिघांना पकडले : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

Bhamte from Madhya Pradesh, Bihar jailed for stealing trains | रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्या करणारे मध्यप्रदेश, बिहारमधील भामटे जेरबंद

रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्या करणारे मध्यप्रदेश, बिहारमधील भामटे जेरबंद

नागपूर: संधी साधून रेल्वेगाड्या किंवा स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल तसेच माैल्यवान चिजवस्तूंची चोरी करणाऱ्या तीन भामट्यांच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बुधवारी मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेल्या या चोरट्यांमध्ये दोघे जबलपूर, मध्यप्रदेश तर एक जण बेगुसराय, बिहारचा रहिवासी आहे.

सध्या विविध मार्गावरील रेल्वे गाड्यांमधील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. या गर्दीचा फायदा उठवत अनेक चोर भामटेही सक्रिय झाले आहेत. सधी मिळताच ते प्रवाशांचे मोबाईल, बॅग तसेच माैल्यवान चिजवस्तू लंपास करतात. अशा प्रकारच्या घटना सारख्या वाढत असल्यामुळे आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांना या भामट्यांना हुडकून काढण्यासाठी कामी लावले आहे. बुधवारी अशाच प्रकारे आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मिना यांच्या नेतृत्वात एएसआय मनोज पांडे, अमित कुमार, हवलदार कुंदन फुटाने, आरक्षक धीरज दलाल, दीपा कैथवास आणि नीरज कुमार रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवून असताना त्यांना दिवसभरात तीन भामटे सापडले.

संजय बाबूलाल मरकाम (वय ३२, रा. नैनपूर, मंडला, जबलपूर), किशोर संतोष जाटव (वय २६, रा. भानतलैय्या, जबलपूर) आणि बिहारमधील नयानगर, बेगुसराय येथील शिवम रमेश साहा (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी मरकाम याने २३ हजारांचा मोबाईल चोरला होता, तो आरपीएफने ताब्यात घेतला. तर, जाटवकडून १३ हजाराचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. साहा नामक आरोपीवर कलम १०९ नुसार कारवाई करण्यात आली. या तिघांना प्राथमिक चाैकशीनंतर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस त्यांची चाैकशी करीत आहेत.

Web Title: Bhamte from Madhya Pradesh, Bihar jailed for stealing trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.