शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक; दरवर्षी पाच हजारांवर लोकांची जाते दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 18:10 IST

Nagpur : दुखापतींमध्ये १६ वर्षांखालील ४९ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोशणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहात सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषतः फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते. अनार, सुतळी बॉम्ब, चक्री आणि रॉकेट या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो. दमा व अॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. यामुळे फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते 

फटाक्यांच्या धोक्यापासून १६ वर्षांखालील मुलांना जपाबंगरुळू येथील शासकीय मिंटो ऑप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील आणि रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती सादर केली आहे. यात फटाक्यांमुळे झालेल्या डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वर्षांखालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे. यामुळे फटाक्यांपासून १६ वर्षांखालील मुलांना जपा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.

बघणाऱ्यांना जास्त इजासारक्षी नेत्रालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त इजा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवावा लागू शकतो. बारूदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.

जखम झाल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या "फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांपर्यंत पोहचेपर्यंत डोळे चोळू नका. यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. डोळा खराब होण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा." - डॉ. प्रशांत बावनकुळे, नेत्ररोग तज्ज्ञ. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024nagpurनागपूर