सावधान ! नागपुरात कचरा टाकताय? मनपा करेल कठोर कारवाई; २ दिवसांत वसूल केला ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:57 IST2026-03-30T19:56:19+5:302026-03-30T19:57:28+5:30

Nagpur : उपराजधानीला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे 'उपद्रव शोध पथक' आता अधिक ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

Beware! Are you dumping garbage in Nagpur? Municipal Corporation will take strict action; Fine of Rs 50 thousand collected in 2 days | सावधान ! नागपुरात कचरा टाकताय? मनपा करेल कठोर कारवाई; २ दिवसांत वसूल केला ५० हजारांचा दंड

Beware! Are you dumping garbage in Nagpur? Municipal Corporation will take strict action; Fine of Rs 50 thousand collected in 2 days

नागपूर: उपराजधानीला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे 'उपद्रव शोध पथक' आता अधिक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात कुठेही अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत, गेल्या दोन दिवसांत (रविवार आणि सोमवार) तब्बल ९९ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून संबंधितांकडून ४८,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

​कोणावर झाली कारवाई?

  • ​मनपाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, वेगवेगळ्या झोनमध्ये विविध कारणांसाठी दंड आकारण्यात आला आहे:
  • फेरीवाले आणि स्टॉल्स: परिसर अस्वच्छ ठेवल्याबद्दल ३८ विक्रेत्यांकडून १५,२०० रुपये वसूल.
  • सार्वजनिक ठिकाणी कचरा: रस्ता किंवा फुटपाथवर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती आणि दुकानदारांवर कारवाई.
  • अन्न कचरा: उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी फेकल्याबद्दल ५,००० रुपयांचा दंड.
  • विनापरवानगी फलक: विद्युत खांबावर अनधिकृत फलक लावणाऱ्या कोचिंग क्लासेसवरही मनपाचा हातोडा.
  • प्लास्टिक बंदी: ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर ५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई.

 

​प्रमुख दंड आणि झोननिहाय कारवाई:

  • ​या मोहिमेत काही मोठ्या संस्था आणि व्यक्तींवर प्रत्येकी ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे:
  • लक्ष्मीनगर झोन: रस्त्यालगत राडारोडा (C&D कचरा) टाकल्याबद्दल पंकज महाजन यांना दंड.
  • धरमपेठ झोन: महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकल्याबद्दल).
  • धंतोली व गांधीबाग झोन: विनापरवानगी खांबावर फलक लावल्याबद्दल 'फ्लोरायझॉन प्री-स्कुल' आणि 'डी.डी.एस अकॅडमी'वर कारवाई.
  • सतरंजीपुरा झोन: खतरी किराणा स्टोअर्स (प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर).
  • लकडगंज झोन: रस्त्यावर स्क्रॅप मटेरियल पसरवल्याबद्दल सीराजउद्दीन अंसारी यांना दंड.


​अस्वच्छता पसरवल्यास होणार कठोर कारवाई!

​ही संपूर्ण कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. केवळ रस्तेच नाही, तर फुटपाथवर जनावरे धुणे, चिकन-मटण सेंटरचा कचरा टाकणे आणि वर्कशॉपचा कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांवरही मनपाची करडी नजर आहे. नागपूरकरांनी शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

Web Title : नागपुर में कचरा फेंकने पर जुर्माना: दो दिन में ₹50,000 वसूले!

Web Summary : नागपुर में स्वच्छता अभियान तेज, दो दिन में कचरा फेंकने वालों पर ₹48,400 का जुर्माना। अवैध स्टॉल, सार्वजनिक कचरा, अनाधिकृत बैनर और प्रतिबंधित प्लास्टिक पर जुर्माना। निर्माण मलबे, खाद्य अपशिष्ट और अवैध होर्डिंग पर भी जुर्माना लगाया गया। नागरिकों को चेतावनी।

Web Title : Nagpur Fines Litterbugs: ₹50,000 Collected in Two Days!

Web Summary : Nagpur intensifies cleanliness drive, fining litterers ₹48,400 in two days. Penalties targetted illegal stalls, public waste disposal, unauthorized banners, and banned plastics. Major fines issued for construction debris, food waste, and illegal hoardings. Nagpur residents warned of strict action for non-compliance.