भारत-पाक सामन्यावर बेटिंग, आरोपीला रंगेहाथ अटक
By योगेश पांडे | Updated: October 15, 2023 15:02 IST2023-10-15T14:57:31+5:302023-10-15T15:02:44+5:30
सागर नत्थुलाल बनोदे (४२, गाडगे नगर, रमना मारोती) असे आरोपीचे नाव आहे.

भारत-पाक सामन्यावर बेटिंग, आरोपीला रंगेहाथ अटक
नागपूर : भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान बेटिंग करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
सागर नत्थुलाल बनोदे (४२, गाडगे नगर, रमना मारोती) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी सामना सुरू असताना सागर घरूनच बेटिंग करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता सागर फोनवरूल खायवाडी करून बेटिंग करताना दिसून आला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी टीव्ही, सेटटॉप बॉक्स, मोबाईल्स, आकडेवारीची नोंद असलेली डायरी व इतर साहित्य जप्त केले. त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करून नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.