शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दत्तक गाव योजनेला खीळ

By admin | Updated: January 9, 2016 03:31 IST

जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ ३७ सदस्यांनीच गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांपैकी केवळ ३७ सदस्यांनीच गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे. उर्वरित २१ सदस्य मात्र अजूनही उदासीन असल्याची माहिती समोर आली आहे. यात बहुतांश सदस्य विरोधी पक्षातील असल्याचे दिसते. त्याचबरोबर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनीही योजनेला गंभीरतेने घेतले नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेत पंतप्रधानांनी राबविलेल्या दत्तक ग्राम योजनेबद्दल दिसून आलेल्या उदासीनतेमुळे या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. प्रत्येक खासदाराने किमान एक गाव दत्तक घेऊन ‘गाव दत्तक’ योजनेंतर्गत त्या गावाचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला राज्य सरकारनेही प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांसह बहुतांश आमदारांनी एक गाव दत्तक घेऊन गावाच्या विकासाला चालना दिली. पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेतही करण्यात आले. सर्वप्रथम जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी गाव दत्तक घेतले. त्यांच्यापाठोपाठ काही सदस्यांनीही गावे दत्तक घेण्यास सुरुवात केली. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तालुक्यातील फेटरी तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विहीरगावसह तीन गावे दत्तक घेतली. आराखडा तयार करून संबंधित गावांमध्ये विकासकामेही सुरू झाली आहेत. जि. प. हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील असंख्य गावे अजूनही समस्याग्रस्त व अविकसित आहेत. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष सभापतींनी या योजनेंतर्गत गावे दत्तक घेऊन मनाचा मोठेपणा किंबहुना त्या गावांचा विकास करण्यास पुढाकार घेतला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, वीज नाही, शिक्षण, आरोग्याची सोय नाही. त्यामुळे इतर सदस्यांनी गावे दत्तक घेऊन विकास केल्यास गावे समृद्ध व निर्मल होतील. मात्र, २१ सदस्यांनी या योजनेकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. सभागृहात ग्रामीण समस्या पोटतिडकीने मांडण्याचा ‘फार्स’ करणाऱ्या अनेक सदस्यांनी गावेच दत्तक घेतली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)