शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अपघातविरहित शहर व्हावे

By admin | Updated: January 13, 2015 01:08 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी,

पालकमंत्र्यांचे आवाहन : रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटननागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने भविष्यात अपघातविरहित शहर व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी, अपघात स्थळांचा शोध घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व यांच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी झाले. शहर कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्रामीण शरद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, रवींद्र भुयार उपस्थित होते.प्रत्येकाने वाहन चालविताना तसेच रस्त्यावरून चालताना स्वत:च्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली पाहिजे. रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृतीसाठी तसेच कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य पुरवठा जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कृष्णा म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान कार्यालयापुरतेच मर्यादित ठेवू नका. शाळा-महाविद्यालयापर्यंत पोहोचवा. या अभियानात सामाजिक संस्था, संघटना यांचाही सहभाग करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शरद जिचकार यांनी केले. त्यांनी या अभियानात राबिवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. आभार सर्जेराव शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन कर वसुली अधिकारी नाना समर्थ यांनी केले. कार्यक्रमाला शहर बस आॅपरेटर्स डीलर्स, वाहन चालक, ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, राजीव स्पोर्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुधे, जीवन सुरक्षाचे राजू वाघ, जनआक्रोश संघटनेचे सचिव रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)