शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:31 PM

शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे४००० उत्कृष्ट शौचालयांना मिळणार पुरस्कार : ग्रामस्थांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे.या स्पर्धेत शौचालयांची रंगरगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहिल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती व नियमित वापर करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आपले शौचालय स्वच्छ सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात यासाठी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेची अंतीम तारीख ३१ जानेवारी आहे. प्रत्येक कुटुंबाने स्वनिधीतून आपल्या वैयक्तिक शौचालयांची रंगरंगोटी करणे अनिवार्य असून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहिणे गरजेचे आहे.जिल्ह्यांतर्गत कुटुंबस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतींमधील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. गावापासून राज्यापर्यंत पुरस्कारया स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हे निवडले जाणार आहे. त्यांनतर संबंधित तिन्ही जिल्ह्यातील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड केली जाणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या राज्यांचे, जिल्ह्यांचे व कुटुंबांची निवड राष्ट्रीय स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने गठित केलेल्या समितीकडून होणार आहे.नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यावर शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी तसेच त्याची निरंतर अंमलबजावणी होत राहण्यासाठी जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण स्तरावर स्वच्छतेचा जागर होणार आहे. संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषद