महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:19 IST2019-11-30T20:19:02+5:302019-11-30T20:19:34+5:30

हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Beating between college officials and alumni | महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिंगणा भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ. ब्रह्मानंद करंजीकर (६४) रा. कॉर्पोरेशन कॉलनी हे वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजचे चेअरमन आहेत. ते शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता कॉलेज परिसरातील बगिच्याच्या कामाचे निरीक्षण करीत होते. दरम्यान आरोपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सचिन शेंडे (३५) तिथे आले. तो करंजीकर यांना दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका अ‍ॅडमिशनसाठी दिलेले पैसे परत करण्याबाबत वाद घालू लागला. वाद वाढल्यावर सचिनने कुठल्यातरी वस्तूने डॉ. करंजीकर यांचा चेहरा व डोळ्याजवळ हल्ला करून जखमी केले. त्यांना शिवीगाळ करीत पाहून घेण्याची धमकी देऊ लागला. दरम्यान डॉ. करंजीकर यांनीही आपल्या कॉलेज कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. फिर्यादी करंजीकर यांच्या तक्रारीरून हिंगण्याचे एएसआय सुनील भांडेगावकर यांनी आरोपी सचिनविरुद्ध मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे फिर्यादी सचिन शेंडे रा. महाजन वाडी याच्यानुसार तो कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनचे पैसे भरायला आला होता. त्याचा जुन्या पैशावरून डॉ. करंजीकराशी वाद झाला. आरोपी करंजीकर व प्रा. गंगवानी यांनी आणखी ५ ते ६ लोक यांनी मिळून सचिनला मारहाण केली. आरोपींनी सचिनची बाईक क्रमांक (एमएच/३१/सीडब्ल्यू/४८२९) ची तोडफोड केली. सचिनच्या तक्रारीवरून डॉ. करंजीकर , प्रा. गंगवानी व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध मारहाण व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating between college officials and alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.