कोविड संवाद ; प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:46 AM2020-10-08T10:46:54+5:302020-10-08T10:47:16+5:30

plasma corona Nagpur News कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे प्लाझ्मा दान करून इतरांचा जीव वाचवावा, असे आवाहनडॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले आहे.

Be a plasma donor; Save the lives of others! | कोविड संवाद ; प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा!

कोविड संवाद ; प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा!

Next
ठळक मुद्देडॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडसाठी प्रभावी औषध वा लस अद्यापही उपलब्ध नाही. मात्र प्लाझ्मा हा एक महत्वाचा पर्याय आहे. ‘आरबीडी’ (रिसेप्टर बॉयडिंग डोमेन) प्लाझ्मा ही प्रगत उपचार पद्धती आहे. त्याचे परिणामही उत्तम दिसून आले आहे. प्लाझ्माद्वारे पेशींची प्रतिकारशक्ती वाढवून विषाणूला बाहेरच थांबविले जाते. त्यामुळे व्हायरस तिथेच मृत होतो. ही उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे प्लाझ्मा दान करून इतरांचा जीव वाचवावा, असे आवाहन मेडिकल संचालक, आरबीडी प्लाझ्मा बँक, लाईफलाईन रक्तपेढीचे डॉ. हरीश वरभे आणि प्रभारी क्रिटिकल केअर फिजिशियन, कोविड युनिट भवानी हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी 'कोविड प्लाझ्मा दान आणि आरबीडी-प्लाझ्मा उपचार' या मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना बाधितांसाठी प्लाझ्मा हे वरदान आहे. मागील १०० वर्षांपासून प्लाझ्माचा महामारीमध्ये उपयोग केला जात आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने चार मुख्य घटक असतात. श्वेत रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स), तांबड्या रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) आणि रक्तद्रव (प्लाझ्मा) प्लाझ्मा दात्यांच्या शरीरातून रक्त देतेवेळी अद्ययावत उपकरणाद्वारे केवळ प्लाझ्माच घेतला जातो. यामध्ये प्लाझ्मा दात्याला कोणताही धोका नाही. प्लाझ्मा दान केल्याने आणखी जास्त अशक्तपणा येतो, प्रतिकारशक्ती कमी होते हे सर्व गैरसमज आहेत.

प्लाझ्मा दान शिबिर राबवा
दात्याच्या शरीरातून ४०० मिली प्लाझ्मा घेतला जातो आणि विशेष म्हणजे त्यातून दोन लोकांचा जीव वाचविता येतो. कोविड रुग्णाला जेवढ्या लवकर प्लाझ्मा दिला जाईल तेवढी जास्त रुग्ण बरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मा दान शिबिर राबविणेही अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोविडमधून बरे झालेल्यांसह सर्वांनीच पुढे यावे, असे आवाहन हरीश वरभे आणि कौस्तुभ उपाध्ये यांनी केले.
 

 

Web Title: Be a plasma donor; Save the lives of others!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.