शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरने गरीब वृद्ध शेतकऱ्याची केली १० लाखांची फसवणूक; एफडी करतो सांगून केला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:30 IST

Nagpur : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लखमापूर गावातील वृद्ध शेतकऱ्याची बँकेकडून दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची बाब पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लखमापूर गावातील वृद्ध शेतकऱ्याची बँकेकडून दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची बाब पुढे आली आहे. शिवाजी चिमणा भलावी (वय ८०) यांची समृद्धी महामार्गात शेती गेल्यामुळे शासनाकडून मोबदल्याच्या स्वरूपात त्यांना काही रक्कम मिळाली होती. ती रक्कम त्यांनी आमगाव देवळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील शाखेत ठेवली होती. तेव्हा खात्यात असलेली ती रक्कम पाहून त्यावेळी कार्यरत असलेल्या महिला बैंक व्यवस्थापक श्रुती बोरकर यांनी शेतकरी शिवाजी भलावी यांना बँकेत बोलावून बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यास सांगितले. 

त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी तयार होऊन त्यांनी सह्या दिल्या. मात्र त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत बँक व्यवस्थापकाने त्यांची ती रक्कम खाजगी कंपनीत परस्पर त्यांना न सांगता वळती केली. एफडीच्या नावावर बँक व्यवस्थापकाने १२ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्याच्या खात्यातून ५ लाख २२ हजार ५०० रुपये खाजगी कंपनीत पाठवले. तसेच दुसऱ्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा शेतकऱ्याच्या बैंक खात्यातून ५ लाख ११ हजार २५० रुपये खाजगी कंपनीत वळते झाले. त्यावेळी शिवाजी भलावी यांनी चौकशी केली असता त्यांना बँकेद्वारे सांगण्यात आले की, ते एफडीचे आहेत व पाच-सहा वर्षांनी मिळतील. परंतु शिवाजी भलावी यांचा बँक व्यवस्थापकावरचा विश्वास उडाल्यामुळे त्यांनी खात्यातून रक्कम कमी करणे सुरू केले.

मात्र आता पाच वर्षांनंतर वृद्ध शेतकरी रक्कम काढायला गेले असता भरलेली रक्कम ही त्यांना परिपूर्ण परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर त्यांनी वकिलामार्फत रिझर्व्ह बँक, बैंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय कार्यालय व बैंक ऑफ महाराष्ट्र आमगाव शाखा यांना लेखी तक्रार सादर केली आहे.

"आमच्या अडाणीपणाचा (अशिक्षितपणाचा) फायदा घेत आमची बँक व्यवस्थापकाने फसवणूक केली. म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे की माझे भरलेले पूर्ण पैसे व्याजासहित परत देण्यात यावे. त्या बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून माझ्यासारख्या अशिक्षित लोकांची बँकेमध्ये फसवणूक केली जाणार नाही."- शिवाजी भलावी, तक्रारदार

"अशा प्रकरणांमध्ये ग्राहकांना न्याय मिळू शकते. यासाठी नागरिकांनी ग्राहक पंचायत, ग्राहक न्यायालय किंवा न्यायालयात जाऊन दाद मागितल्यास अशा प्रकारच्या फसवणुकीत ग्राहकांना न्याय मिळू शकतो."- मल्लिका गोयंका, वकील, नागपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Bank Manager dupes elderly farmer of ₹10 lakh in FD scam.

Web Summary : Bank of Maharashtra manager allegedly swindled an elderly farmer in Lakhmapur of ₹10 lakh under the guise of a fixed deposit. The money, compensation for land acquired for the Samruddhi Expressway, was diverted to a private company without his consent. Police complaint filed.
टॅग्स :fraudधोकेबाजीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रFarmerशेतकरीnagpurनागपूर