शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिकाच पारदर्शक व परवडणारी

By admin | Updated: April 19, 2017 02:42 IST

देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

राजकुमार तिरपुडे : मतदाराचा अविश्वास दूर करावा नागपूर : देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला एकतर्फी कौल मिळतो आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. हा वाद बाजूला ठेवून निवडणूक खर्चाचा विचार केल्यास ईव्हीएमपेक्षा मतपत्रिकेचा वापर कमी खर्चात होतो. शिवाय यामुळे निवडणूक पारदर्शी होते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापरच योग्य आहे, असे मत विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तिरपुडे म्हणाले, नाागपूर महापालिकेत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ईव्हीएमचा वापर केल्यामुळे एका प्रभागात सुमारे ६४ लाख रुपये खर्च आला. हीच निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली असती तर फक्त ४० हजार रुपये खर्च आला असता. प्रत्येक बूथवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. एका ईव्हीएमची किंमत २० हजार रुपये आहे. एका बुथवर चार मशीनचा वापर झाला. त्यानुसार एका बूथवर ८० हजार रुपये खर्च झाला. एका प्रभागात सरासरी ८० बुथ होते. त्यानुसार एका प्रभागात फक्त मतदानावर ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले. शिवाय एक ईव्हीएम जास्तीत जास्त १० वर्षे वापरता येते. त्यापुढे त्याचा वापर करणे सुरक्षित मानले जात नाही, असे कायदा मंत्र्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे एक ईव्हीएम तीन ते चार निवडणुकीतच कामी येऊ शकते. त्या तुलनेत मतपत्रिकेचा वापर केला तर कमी खर्चात काम होते. मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यामुळे आपण ज्याला मत दिले त्यालाच ते मिळाले असल्याची मतदाराला खात्री पटते. यावर शंका घेण्यास कुठलीही शक्यता उरत नाही. सध्या देशात ईव्हीएमवर अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. अशात मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास वाढविण्याची तसेच लोकशाही अधिकळ बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला बाबा कोंबाडे, जिल्हाध्यक्ष नाना ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)