शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

‘फंड’ चालवून फसवणाऱ्या महिलेस जामीन

By admin | Updated: February 18, 2015 02:47 IST

‘ कनक फंड’ या नावाने गोरखधंदा सुरू करून दामदुप्पटचे आमिष दाखवीत महिला गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका महिला आरोपीला...

नागपूर : ‘ कनक फंड’ या नावाने गोरखधंदा सुरू करून दामदुप्पटचे आमिष दाखवीत महिला गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या एका महिला आरोपीला शनिवारी अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कु. आर. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. कनक सुनीलकुमार मिश्रा, असे आरोपी महिलेचे नाव असून ती नारा ओमनगर येथील रहिवासी आहे. नारा येथील शालिनी मोरेश्वर धोटे या महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी कनक मिश्राविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०४ आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. आरोपी महिलेने २०१३-१४ मध्ये प्रत्येकी १० हजार रुपये महिना या प्रमाणे शलिनीकडून १ लाख २० हजार, चित्रलेखा पटलेकडून २ लाख ८००, भूमिका लिल्हारे आणि सुरेखा बैसारे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये , असे एकूण ५ लाख ६० हजार ८०० रुपये घेऊन त्यांना त्यांचे पैसे परत न करता फसवणूक केली. शिवाय खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी दिली. जरीपटका पोलिसांनी आरोपी महिलेचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. मुदत संपल्याने शानिवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावताच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणातील फिर्यादी महिला शालिनी धोटे यांच्या वतीने अ‍ॅड. प्रसाद यांनी जामिनास विरोध केला. आरोपी महिलेने अनेक महिलांकडून फंड गोळा करून ५० लाखाहून अधिक रकमेने फसवले आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करू नये, असे ते युक्तिवादात म्हणाले. बचाव पक्षाच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, गुंतवणूकदार महिलांपैकी काहींचे पती खासगी कंपनीत कामगार आहेत, कोणी प्लंबर तर कोणी पिग्मी एजंट आहेत. त्यामुळे त्यांनी १० हजार रुपये महिना आरोपी महिलेकडे जमा करणे अशक्य बाब आहे. याबाबत त्यांच्याकडे पुरावेही नाहीत. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपीस जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. पराग उके आणि अ‍ॅड. पंकज राजवाडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)