गिट्टीखदान चौकात दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:12+5:302021-02-15T04:09:12+5:30

सायकल ट्रॅकवरच पार्किंग नागपूर : महानगरपालिकेने अलीकडे रस्त्याच्या किनाऱ्यालगत सायकल ट्रॅक तयार केला आहे. यावरून सायकली चालविणे सोपे व्हावे ...

Bad condition in Gittikhadan Chowk | गिट्टीखदान चौकात दुरवस्था

गिट्टीखदान चौकात दुरवस्था

सायकल ट्रॅकवरच पार्किंग

नागपूर : महानगरपालिकेने अलीकडे रस्त्याच्या किनाऱ्यालगत सायकल ट्रॅक तयार केला आहे. यावरून सायकली चालविणे सोपे व्हावे हा हेतू असला तरी या ट्रॅकवर आता वाहने पार्क होतात. परिणामत: नाइलाजाने सायकलचालकांना भर रस्त्यावरून सायकली चालवाव्या लागतात. अर्थात हे धोकादायक असले तरी यावर उपाय मात्र नाही.

तुटलेल्या खुर्च्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा

नागपूर : येथील मेडिकल केटीबी वाॅर्डामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्याचा उपयोगही चांगला व्हायचा. मात्र मागील दोन महिन्यांपासून त्या तुटल्या आहेत. असे असले तरी त्यांच्या दुरुस्तीकडे कुणाचे लक्ष नाही किंवा त्यांना हटवून नव्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या नाहीत. रोज सकाळी-सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोकळ्या हवेत बसण्यासाठी ही सुविधा होती. मात्र आता वृद्धांना बसण्यासाठी जागा राहिलेली नाही.

Web Title: Bad condition in Gittikhadan Chowk