शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

चार वर्षात मागासवर्गीयांच्या पदभरतीचा अनुशेष तीन लाखांवर : कृष्णा इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:41 AM

महाराष्ट्र शासनाने २०१४ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीवर अघोषित बंदी आणली असून सरकारच्या या धोरणामुळे मागासवर्गीयांचा अनुशेष वाढत आहे. २०१८ पर्यंत हा अनुशेष तीन लाखावर गेला असल्याची टीका कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे‘कास्ट्राईब’चे राज्यभरात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने २०१४ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीवर अघोषित बंदी आणली असून सरकारच्या या धोरणामुळे मागासवर्गीयांचा अनुशेष वाढत आहे. २०१८ पर्यंत हा अनुशेष तीन लाखावर गेला असल्याची टीका कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली आहे.मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे शनिवारी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. नागपुरात संविधान चौक येथे कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. त्यावेळी ते बोलत होते.मागासवर्गीयांचा २ लाख ९० हजाराचा अनुशेष भरण्यात यावा, पदोन्नतीमधील ७७ हजारांचा अनुशेष भरावा, कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, कृषी,अकृषी विद्यापीठातील अनुशेष भरण्यात यावे, ३८०० कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल खराब केले ते रद्द करण्यात यावे आदी विविध मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधत ही ‘लोकशाही की पेशवाई ’असा सवालही उपस्थित केला. या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना सादर करण्यात आले.आंदोलनात आमदार ना.गो. गाणार माजी सनदी अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, सच्चिदानंद दारुंडे आदींनी सदिच्छा भेट देऊन पाठिंबा दर्शविला. धरणे आंदोलनात सत्यजित रामटेके, डॉ. सोहम चवरे, नरेंद्र धनविजय, नरेश मेश्राम, राजकुमर रंगारी, बाळासाहेब बन्सोड, परसराम गोंडाणे, जालंधर गजधारे, चंद्रदर्शन भोयर, प्रबोध धोंगडे, सुभाष गायकवाड, बबन ढाबरे, प्रेमदास बागडे, पंकज उलीपवार, अविनाश इंगळे, रतनसिंह बावरी, अजय वानखेडे, दिलीप चौरे, अरविंद गणवीर, जगन्नाथ सोरते, चंदन चावरिया, आकाश डोगोरिया, देवीदास हेलोंडे, अशोक राऊत आदी सहभागी होते.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीEmployeeकर्मचारी