शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन; अजित पवार व पंकजा मुंडेंच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:41 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी : नागपूरच्या ट्राफिक पार्कजवळ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे माजी आ. बच्चू कडू यांनी बुधवारी अनोखे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ परिसरातील ट्राफिक पार्क जवळ रक्तदान शिबिर आयोजित करीत आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान आंदोलन करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजी राजांची आज जयंती आहे. संभाजी महाराज यांनी एकेक रक्ताचा थेंब सांडून स्वराज्य निर्माण करण्याचा आणि रक्षण करण्याचे काम केले. आम्ही शेतकरी आणि दिव्यांगांचा रक्षण करण्यासाठी आज रक्तदान केले. सातबारा कोरा करणार, असे म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना अन्नदाता आणि दिव्यांगांसाठी केलेल्या रक्तदानातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. रक्त सांडवण्यापेक्षा रक्तदान करून केलेल्या आंदोलनाची दखल घेतली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.

कर्जमाफीवर मुख्यमंत्री बोलत नाहीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत. ते खरे रामभक्त असतील तर उद्याचं रक्त सांडवण्याचा आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा, या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते कर्जमाफीवर बोलतच नाही, त्यांनी बोलते व्हावे यासाठी हे आंदोलन केल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

आता अजित पवार व पंकजा मुंडेंच्या घरासमोर आंदोलन

  • रायगड आंदोलन झाले, नंतर मशाल आंदोलन झाले. आज रक्तदान आंदोलन केलं. आता आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर २ जूनला चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथे बजेटचा संक्षिप्त उतारा अजितदादांसमोर मांडणार आहोत.
  • यानंतर ३ तारखेला पंकजा मुंडेंच्या गावात जाणार, नंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या गावात कर्जमाफी विषयी आम्ही बोलणार आहोत. ६ जून रोजी पुन्हा नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर चटणी-भाकर घेऊन थांबणार आहोत.
  • यानंतरही कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर तुकडोजी महाराजांच्या मोझरी या गावी ७ जूनपासून आपण स्वतः या सर्व मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPankaja Mundeपंकजा मुंडे