शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोटातच बाळ दगावले : डॉक्टर नसल्याने रुग्णवाहिका निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:12 IST

तिला कसेतरी नागपूर येथील मेयो रुग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी बाळाचा (मुलगा) गर्भातच मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय मातेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) येथे शुक्रवारी घडला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार ): प्रसुतीकळा सुरू झाल्याने महिलेला देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टर त्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन तपासणीसाठी दुसऱ्या डॉक्टरकडे निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत रुग्णवाहिकेसोबत जाण्यासाठी दुसरा डॉक्टर नसल्याने त्या महिलेला ताटकळत राहावे लागले. त्यानंतर तिला कसेतरी नागपूर येथील मेयो रुग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी बाळाचा (मुलगा) गर्भातच मृत्यू झाल्याचे सांगितले. शिवाय मातेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा प्रकार देवलापार (ता. रामटेक) येथे शुक्रवारी घडला.अरुणा पवन पैठणकर (२२, रा. धारणी, जिल्हा अमरावती) ही महिला गर्भवती असल्याने बाळंतपणासाठी तिच्या माहेरी रामटेकडी (ता. रामटेक) येथे आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती असतानाच शुक्रवारी पहाटे रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे तिच्या पतीने तिला सकाळी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्रास वाढल्याने तसेच उपचाराची प्रभावी योय नसल्याने डॉक्टरांनी तिला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पतीला खासगी रुग्णवाहिका बोलावून तिला नागपूरला हलविणे शक्य झाले नाही. देवलापार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आहे. पण, येथील डॉ. अर्जुन भाटिया यांनी त्या रुग्णवाहिकेसोबत जाणे टाळले.त्यांची पत्नी सुधा या गर्भवती असल्याने त्यांना डॉक्टरकडे तपासणीसाठी न्यावयाचे असल्याचे कारणही त्यांनी सांगितले. शिवाय, ते पत्नीला घेऊन खासगी वाहनाने नागपूरला निघून गेले.पतीने १०८ क्रमांकावर संपर्क साधला. हिवराबाजार, मनसर, पारशिवनी, कन्हान, कोदामेंढी यापैकी कुठेही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रक्रियेत जवळपास दोन तास निघून गेले. अशातच स्थानिक आशा सेविका कविता भलावी हिने अरुणा यांची गंभीर अवस्था विचारात घेतली आणि रुग्णवाहिकेकरिता बरीच धावपळ केली. तिने १०२ वर फोन करुन दवाखान्याची रुग्णवाहिका बोलावली. सदर रुग्णवाहिका असूनही येथील डॉक्टरांनी थोडी माणुसकी दाखविली नाही. शेवटी तब्बल दोन तासानंतर तिला देवलापार ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने नागपूर येथील डागा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी बाळ एक ते दीड तास आधी पोटातच दगावले असल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली.नॉर्मलसाठी प्रतीक्षाबाळाला बाहेर काढण्यासाठी अरुणा यांना मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यावेळी सलाईन लावण्यात आली होती. शिवाय, रक्तही चढविण्यात आले होते. नातेवाईकांनी सिझेरियन करुन बाळ काढण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नॉर्मलच होईल असे सांगत तिथे कोणीही येऊ नये, असे बजावले. सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान बाळाला पोटातून बाहेर काढण्यात आले. अरुणा यांची प्रकृती गंभीर असून धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर