शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आईपासून पोरकी झालेल्या बालकांना आता पावडरचे नाही, आईचे दूध मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:41 IST

मेडिकलमध्ये मातृ दुग्धपेढी : यंत्रसामग्री, साहित्य आले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु आईपासून पोरकी झालेल्या बालकांना नाइलाजाने गाई-म्हशीचे किंवा पावडरचे दूध देण्याची वेळ येते. अशा बालकांसाठी वरदान ठरणारी 'मातृ दुग्धपेढी' आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे.

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयात मातृ दुग्धपेढी सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने २०१९ मध्ये घेतला. या पेढीला लागणारी जागा व कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूरच्या मेयोसह मेडिकल व डागा रुग्णालयाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला. दरम्यानच्या काळात 'राष्ट्रीय हेल्थ मिशन'च्या (एनएचएम) पथकाने निवडक रुग्णालयाची पाहणी केली. यात मेडिकलचाही समावेश होता. उपलब्ध जागा व मनुष्यबळाचे समाधान झाल्याने बालरोग विभागाच्या तीन डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. परंतु पुढे निधीअभावी हा प्रस्ताव बारगळला.

दरम्यान २०२१ मध्ये डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात (डागा) मातृ दुग्धपेढी स्थापन झाली. याच दरम्यान मेडिकलच्या मातृ दुग्धपेढीला १.३० कोटींना मंजुरी मिळाली. यातून आवश्यक साहित्य व यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली.

३०० लिटर दूध साठविण्याची क्षमतामेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले की, 'ह्युमन मिल्क बैंक'साठी निधी उपलब्ध होताच आवश्यक साहित्य व यंत्रसामग्रीची खरेदीला सुरुवात झाली आहे. ही पेढी वॉर्ड क्र. २५ मध्ये स्थापन होईल. जवळपास ३०० लिटर दूध साठविण्याची क्षमता असेल. सहा महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवता येईल. साधारण दोन-तीन महिन्यांत ही पेढी नवजात बालकांच्या सेवेत असणार आहे.

"आईचे दूध नवजात बालकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशोवळी गायीचे दूध किंवा दुधाची पावडर देण्याची वेळ येते. ज्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावण्याचा धोका असतो. यावर उपाय म्हणून मेडिकलमध्ये 'मातृ दुग्धपेढी' स्थापन केली जात आहे. या पेढीचा लाभयेथील नवजात बालकांना तर होईल बाहेरही दुग्ध पाठविण्याची सोय उभी केली जाईल."- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :nagpurनागपूर