शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक

By admin | Updated: February 9, 2015 00:58 IST

आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे,

‘बाबांचे शिलेदार’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन नागपूर : आज देशामध्ये वाढत्या लोकसंख्येत माणसांची कोणतीही कमी नाही. परंतु माणुसकीचा दुष्काळ पडतो आहे. त्यामुळे समाजासमाजात, जाती-धर्मात, पंथात माणूस विभागाला जात आहे, अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.आंबेडकरी चळवळीतील सहकारी सत्कार मंचच्यावतीने आयोजित अ‍ॅड. हंसराज भांगे लिखित ‘बाबांचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते रामगोपाल माहेश्वरी सभागृहात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, आ. डॉ. मिलिंद माने, माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, डॉ. पूरण मेश्राम, समता सैनिक दलाचे प्रमुख हरीश चहांदे, बाबा हातेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील प्रमुख अतिथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सर्व दीनदुबळे, शोषितांची चळवळ आहे. या चळवळीत ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले, बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत कामे केले, अशा बाबांच्या शिलेदारांना समाजापुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम हंसराज भांगे यांनी केले आहे. हा ग्रंथ अतिशय अमूल्य असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, तेव्हा समाजकल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व वसतिगृहांमध्ये हा ग्रंथ पोहाचवण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी यावेळी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांनी सध्याचा काळ अतिशय कठीण असल्याची जाणीव करून दिली. या कठीण काळात बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणखी एकजुटीने राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांना आपल्या अनुयायांपासून मोठ्या अपेक्षा होत्या. तेव्हा एकजुटीने ही चळवळ गतिमान ठेवण्याचा प्रयत्न करू या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रंथाचे लेखक अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी यावेळी प्रस्ताविक व आपले मनोगत व्यक्त केले. भंते नाग दीपांकर यांनी बुद्धवंदना सादर केली. ललित खोब्रागडे यांनी संचालन केले. रामभाऊ आंबुलकर यांनी आभार मानले. गजानन आवळे, डी.एम. बेलेकर, सुधीर मेश्राम, भय्या शेलारे, सुधीर भगत, भीमराव गणवीर, नरेश मेश्राम, डी.एम. बेलेकर आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)