शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Ayodhya Verdict : उपराजधानीने जपली सामाजिक सौहार्दाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:15 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली.

ठळक मुद्देशहरवासीयांनी राखली शांतता व संयम : सलोखा पाळला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली. सर्वधर्मीय नागरिकांनी सामाजिक सलोखा पाळला व संयम राखला. नागपूर शहराच्या प्रतिमेला कसलाही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी नागरिकांनी घेतली व विशेष म्हणजे एकमेकांना तसे आवाहनदेखील केले. शहरात जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. रात्रीपासूनच शहरात जागोजागी पोलीस दिसून येत होते. निकाल लागल्यानंतर सर्व जातीपंथाच्या लोकांनी त्याचे स्वागत केले.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सर्वच पंथ-धर्मातील लोकांनी त्याचे स्वागत केले. हा निर्णय सर्वांना एकत्र आणणारा ठरला असा नागपूरकरांचा सूर होता. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनीदेखील त्याचे स्वागत केले. प्रकरणाची तीव्रता व गंभीरता लक्षात घेता सर्वांनीच अनावश्यक जल्लोष टाळला. काही ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आले, मात्र नागरिकांनी कुठेही संयम ढळू दिला नाही. विविध प्रार्थनास्थळांमध्ये नियमितपणे धार्मिक विधी पार पडले. सर्वच समुदायातील धर्मगुरुंनी शांततेचे आवाहन केले होते व नागपूरकरांनी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील शहरातील एकोपा कायम राहील यादृष्टीने नियोजन केले. मुस्लिम बांधवांकडूनदेखील तसेच आवाहन करण्यात येत होते. एकाप्रकारे शहरवासीयांनी राष्ट्रीय एकात्मतेचेच दर्शन घडविले.नागपुरात शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनदेखील करण्यात आले होते. दिवसभर शहरात जागोजागी पोलीस होते व कुठेही तणाव जाणवला नाही. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचेदेखील नागरिकांनी कौतुक केले.‘सोशल मीडिया’वर सामाजिक भावसाधारणत: ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून अनेकदा अफवांचा प्रसार होतो. मात्र नागपूरकरांनी या ‘फ्रंट’वरदेखील ‘स्पिरीट’ दाखवून दिले. शुक्रवारी रात्रीपासूनच सर्वांनी ‘सोशल मीडिया’वर जपून ‘पोस्ट’ करावे अशा आवाहनांच्या ‘पोस्ट’ फिरत होत्या. सकाळी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतरदेखील संतुलित ‘पोस्ट’च फिरत होत्या. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर तर बऱ्याच ‘ग्रुप’वर ‘मॅसेज’ टाकण्याचे अधिकार केवळ ‘अ‍ॅडमिन’कडेच होते. ‘स्टेटस’, ‘डीपी’, ‘टाईमलाईन’वर ‘फोटो’ व ‘कमेन्ट्स’ टाकताना संयम दाखविण्यात आला. अनेकांचे शांतता राखण्याचे आवाहन करणारे ‘व्हिडीओ’देखील ‘व्हायरल’ होत होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याnagpurनागपूर