शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

नागपुरात ‘अनादी’ कलेचे अप्रतिम सृजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:32 PM

रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे रसिकांनी हे आनंद म्हणून बघण्यापेक्षा त्यात काय दडलेले आहे, हे बघण्याची रसिकता ठेवावी, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतीन पिढीच्या कलावंतांनी कुंचल्यातून साकारलेला नयनरम्य नजराणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंग, आकार आणि पोत याचे आच्छादन म्हणजे, कलावंताच्या जीवनाचे एक पानच असते. ते पान वाचायला, त्याची अनुभूती घ्यायला रसिकाचे डोळेही कलेचे उपासक असायला हवे. तीन पिढीच्या कलावंतांनी आपल्या कुंचल्यातून उमटविलेल्या रंगछटांचे अप्रतिम सृजन ‘अनादी’ आहे. त्यामुळे रसिकांनी हे आनंद म्हणून बघण्यापेक्षा त्यात काय दडलेले आहे, हे बघण्याची रसिकता ठेवावी, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण सोशल फोरम द्वारे ‘अनादी’ या चित्रप्रदर्शनीचे आयोजन मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. ‘अनादी’ या कलाप्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे ९२ वर्षाचे चित्रकार अरुण मोरघडे, पन्नासीच्या टप्प्यावर असलेले नाना मिसाळ आणि साठीच्या टप्प्यात पोहचणारे दीनानाथ पडोळे यांनी आपल्या कुंचल्यातून आणि कल्पकतेतून साकारलेल्या काही चित्रांचे हे प्रदर्शन आहे. तिघांच्याही नावाच्या आद्यक्षरातून अनादी हे नाव प्रदर्शनीला पडले. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात या तिघांचाही जन्मदिन असल्याने, यानिमित्ताने कलारसिकांना त्यांच्या कलेचे हे सृजन येत्या तीन दिवस अनुभवायला मिळणार आहे.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रमोदबाबू रामटेके उपस्थित होते. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण सोशल फोरमचे दिलीप पनकुले, दीपक कापसे, जयप्रकाश गुप्ता, यांच्यासह चित्रकार विजय बिस्वाल, पंढरीनाथ कुकडे, चंद्रकांत चन्ने यांची उपस्थिती होती. प्रदर्शनीच्या उद्घाटनापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशबाबू चौबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडे यांचे जलरंगातील व्यक्तीचित्र आणि तैलरंगातील वास्तववादी अमूर्तचित्र आदिवासींच्या जीवनशैलीतून अनुभवता येणार आहे. तर नाना मिसाळ यांचे अ‍ॅक्रॅलिक रंगातून अमृत सृजन, थम्ब पेंटिंगच्या माध्यमातून बघायला मिळते आहे. राजकारणात रमूनही कलेचा वसा जोपासणारे दीनानाथ पडोळे यांनी कॅन्व्हासवर साकारलेले अलंकारिक शैलीतील चित्र नेत्रदीपक ठरत आहे. या प्रास्ताविक दीनानाथ पडोळे यांनी केले. संचालन किशोर गलांडे यांनी केले.

टॅग्स :painitingsपेंटिंगnagpurनागपूर