शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

जागृत नागपूरकर घेत आहेत खबरदारी : औषधी दुकानात सोशल डिस्टन्सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:58 PM

नागपूरकरांमध्ये संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. जागरूक नागरिकांतर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.

ठळक मुद्देनागरिकही घरी पाळताहेत स्वच्छतेचे नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने लोक घरात बंद आहेत. नागपूरकरांमध्ये संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. मात्र विषाणूवर कुठलेही औषध उपलब्ध झाले नसल्याने धास्ती आणखी वाढली आहे. त्यामुळे भीतीपोटी आणि जबाबदारीनेही या विषाणूची बाधाच होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. जागरूक नागरिकांतर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.शहरात दूध, भाज्या, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा आहे. त्यामुळे गोंधळ उडण्यासारखी परिस्थिती नाही. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर थोडी धावपळ उडाली होती. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणात फरक पडणार नाही या राज्य शासनाच्या घोषणेनंतर थोडा दिलासा मिळाला. मात्र या वस्तू खरेदी करतानाही मोठी खबरदारी घेतली जात आहे. जागरूक नागरिक घराबाहेर पडताना सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. वस्तू खरेदी करतानादेखील खबरदारी घेत सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. खरेदी करून घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुण्याची प्रॅक्टीस लोक करीत आहेत. दिवसभर मोबाईल, टीव्हीच्या माध्यमातून किंवा कुटुंबाशी संवादाच्या माध्यमातून मनोरंजन केले जात आहे. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. शहरातील चौकातील किराणा दुकानदार, औषधी दुकानदार आणि सुपरशॉपमध्ये काळजी घेतली जाताना दिसून आली. सुपर शॉपीमध्ये नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासणे, हातावर सॅनिटायझर दिले जात आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींना दुकानात येण्यास मनाई केली जात आहे. किराणा दुकानातही बाहेर गोल मार्क करून उभे केले जात आहे. ग्राहक जवळजवळ उभे राहू नयेत याची सूचना केली जात आहे. ही व्यवस्था औषधी दुकानातही दिसून येत आहे. ग्राहकांना सॅनिटायझर दिले जात आहे. त्यांना दूर उभे ठेवले जात आहे आणि एकएक करून बोलावले आणि औषधे तसेच किरणा दिला जात आहे. नागरिकही या व्यवस्थेचे पालन करीत आहेत. शॉपीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरवस्तूंना वेगवेगळ्या लोकांचा हात लागत असल्याने सॅनिटायझर लावण्याच्या व हात धुण्याच्या सूचना आधी देतो. आतमध्ये गर्दी होणार नाही इतकेच लोक सोडले जात आहेत. संपूर्ण तपासणी केल्याशिवाय व ही व्यक्ती आजारी नाही ना याची खात्री केली जात आहे. यामुळे जनजागृती होऊन कोरोना होण्यापासूनदेखील बचाव होईल.विक्की चोरडिया, सुपरशॉपी चालक.विशेष काळजी घेतोएकतर गरज नसेल तर बाहेर पडत नाही. दूध किंवा भाजीची गरज पडेल तेव्हाच बाहेर पडते. मात्र सोबत सॅनिटायझर असतो. खरेदी करण्यापूर्वी व खरेदी केल्यानंतरदेखील हाताला सॅनिटायझर लावतो. घरी आल्यानंतर आधी हातपाय धुऊन नंतरच घरात प्रवेश करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जात आहे. दिवसभर मोबाईल, टीव्ही किंवा कुटुंबाशी संवाद साधत वेळ जात आहे. वाचायला काही पुस्तकेसुद्धा आणली आहेत. मोनाली भोईटे, नागरिकदूर उभे ठेवूनच औषधींचे वितरणदुकानांमध्ये विशेष काळजी घेतली आहे. काऊंटरच्या जवळ येऊन हात लावू नये म्हणून थोड्या अंतरावर रस्सी बांधली आहे. एकएक मीटरच्या अंतरावर गोल केले केले आहेत व ग्राहकांना त्याच गोलवर उभे करण्यात येते. एकएका व्यक्तीला रस्सीपर्यंत बोलावून औषधी देतो. त्यांना सॅनिटायझरही देतो. बाहेर अंतर ठेवा, गर्दी करू नका असा बोर्डच लावला आहे.धरमदास पडोळे, औषधी विक्रेता.रुमाल बांधूनच खरेदीमी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर आलो होतो. सामान खरेदी करण्यापूर्वीच बाहेर हातावर सॅनिटायझर लावण्यात आले. तसेच रुमाल बांधूनच खरेदी केली असून, घरी गेल्यावरही बाहेरच हात धुण्याची व्यवस्था केली आहे. आरती नाईक, नागरिक.आम्ही घरूनच पौष्टिक आहाराची विक्री करतो. बाळंतीण व तीन वर्षापर्यंत नवजात बाळासाठी लागणाऱ्या पौष्टिक खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे. लॉकडाऊन झाल्यापासून विक्री बंद ठेवली आहे. हा आहार बनविणाऱ्या महिलेसही सुटी दिली आहे. आता ज्यांना अधिकच गरज असेल अशाच दाम्पत्याला हा आहार देतो आणि हे सर्व मी स्वत: घरी तयार करते. विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेत आहोत. आराधना ताठे, पौष्टिक आहार वितरक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर