नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 20:09 IST2019-08-26T20:08:48+5:302019-08-26T20:09:38+5:30

नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २८.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Average rainfall in Nagpur region is28.73 mm | नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस

नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात सर्वाधिक १०१.२० मि.मी.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २८.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात सर्वाधिक १०१.२० मि.मी. तर कुरखेडा ६८.५०, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर ८७.०१, सेलू ७५ मि. मी., चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी ७६.३०, चिमूर ७३.२० तर नागभिड तालुक्यात ७२.४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ६७.२० मि. मी. पाऊस पडला आहे.
विभागात सोमवारी सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे आहे. वर्धा ४०.८३ मि.मी. , गडचिरोली ३८.२० मि.मी., चंद्रपूर ३२.८८ मि.मी. , गोंदिया १५.९८ मि.मी., नागपूर २३.५० मि.मी. तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी २०.९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नागपूर विभागात १ जून २०१९ ते २६ आॅगस्ट २०१९ पर्यत सरासरी ८६०.०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

Web Title: Average rainfall in Nagpur region is28.73 mm