ऑटो चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत
By योगेश पांडे | Updated: April 24, 2024 15:13 IST2024-04-24T15:12:29+5:302024-04-24T15:13:32+5:30
Nagpur : आरोपीच्या ताब्यातून ऑटो, १० बॅटरी असा १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur Auto Theft
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटो चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता.
१७ एप्रिल रोजी जयभोलेनगर, मेहंदीबाग रोड निवासी वंदन राजकुमार सातपुते (५०) यांचा ऑटो त्यांच्या घरासमोरून चोरी गेला. त्यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कमधून गुन्हेशाखेच्या पथकाने सूरज नागेश्वर पराते (१९, वनदेवी चौक) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने गणेश मणिराम बागडे (२०, कुंदनलाल गुप्तानगर) याच्या मदतीने ऑटो चोरल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्या ताब्यातून ऑटो, १० बॅटरी असा १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, राजेश लोही, आशीष कोहळे, टप्पुलाल चुटे, प्रमोद वाघ, रामचंद्र कारेमोरे, राजेंद्र टाकळीकर, विशाल नागभिडे, योगेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.