शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक योजनांनी पाडली होती भुरळ!

By admin | Updated: May 16, 2014 00:07 IST

श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना चार योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविले.

श्री सूर्या घोटाळा : काहींना घसघशीत परतावा

अजय डांगे - अकोला

श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना चार योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविले. या योजनांमध्ये पैशांची गुतंवणूक करुन काही ठेवीदारांना कमी कालावधीत फायदा झाल्याची माहितीही उजेडात आली आहे. अकोल्यातील १६ गुतंवणूकदारांना ४३ लाख ३0 हजार ६00 रुपयांचा लाभ या योजनेतून झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.

नागपूर श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने स्वत:चे औद्योगिक प्रकल्प सुरु केले. यामध्ये ऑईल मिल, पर्यटन आणि वाहतुकीसह इतरही प्रकल्पांचा समावेश होता. या उद्योगांसाठी कंपनीला पैशांची गरज भासली. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांमार्फत भांडवल उभे करण्याचा निर्णय घेतला. गुतंवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने योजना तयार केल्या. या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी कंपनीने नागपूर, अमरावती, अकोला आणि पुण्यासह अन्य शहरांमध्ये मेळावे घेतले. तत्पूर्वी, कंपनीने स्थानिक परिचितांना हाताशी धरुन त्यांची बिझनेस असोसिएट्स (एजंट) म्हणून नेमणूक केली. एजंटांनी मेळावे आयोजित करुन गुंतवणूकदरांना प्रोत्साहित करण्याची कामगिरी चोखपणे बजावली. अकोल्यातील अनेक मोठय़ा गुंतवणुकदारांनी १ कोटीपेक्षा जास्त रक्कम गुंतविली.

अशा होत्या फसव्या योजना..

-३ महिन्यांकरिता १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास १३ ते १५ टक्के व्याज देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. बिझनेस असोसिएट्सला (एजंट) ३ ते ५ टक्के कमिशनही दिले जाणार होते.

-दोन वर्षाच्या योजनेत किमान १ लाख रुपयांची गुतंवणूक करण्याचे बंधनकारक होते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजंटला कमिशनही देण्यात आले.

-तिसर्‍या योजनेमध्ये १८ महिन्यांकरिता १ लाख रुपये गुंतविल्यास गुंतवणूदाराला मुदतीनंतर २ लाख रुपये देण्यात येते होते; मात्र मुदत संपण्यापूर्वीच रक्कम काढल्यास गुंतवणूकदारास व्याज दिले जात नव्हते.