शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या व्यथेची दखल

By admin | Updated: August 19, 2016 02:27 IST

राज्य सरकारने २००४ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. बारा वर्षे उलटली परंतु अद्यापही या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही.

निवेदन हायकोर्टाने जनहित याचिका म्हणून स्वीकारले : मुख्य सचिवांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश नागपूर : राज्य सरकारने २००४ मध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. बारा वर्षे उलटली परंतु अद्यापही या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही. ज्येष्ठ नागरिकांनी एका निवेदनाद्वारे पाठवलेली आपली व्यथा उच्च न्यायालयाने जनहित याचिका म्हणून स्वीकारली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने अ‍ॅड. आनंद परचुरे यांना न्यायालय मित्र म्हणून जाहीर करून ज्येष्ठांच्या या निवेदनाला जनहित याचिकेचे स्वरूप देण्याने निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिक मंडळाने हे पत्र १३ मे २०१६ रोजी हायकोर्टाला पाठविले होते. या पत्राची दखल घेत न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, गृह विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सामाजिक कल्याण, महसूल विभागाचे सचिव आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर मागितले आहे. भारताच्या संविधानातील अुनच्छेद ३९ क आणि ४१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य सरकारने महाराष्ट्राचे ज्येष्ठ नागरिक धोरण २००४ मध्ये जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी १२ वर्षे होऊनही झालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर घोर अन्याय होत आहे. या धोरणानुसार ज्येष्ठांचे सर्वतोपरी कल्याण व त्यांना त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजात त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुरक्षित राहावे, त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क , शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी हे धोरण जाहीर करण्यात आले होते. दर पाच वर्षांनी पुनर्विलोकनही करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही. यासाठी सरकारला निर्देश देण्यात यावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील कौस्तुभ लुले यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)