नागपुरात दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:53 IST2018-08-07T22:52:51+5:302018-08-07T22:53:38+5:30
उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

नागपुरात दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
बुंदेल हे व्यावसायिक असून ते सुरेंद्रगड गिट्टीखदानमध्ये राहतात. आरोपी राहुल लांडेकर (वय १९), विष्णू शिशुवार (वय १८) परिक्षित मरस्कोल्हे (वय २०) आणि जॉन फर्नांडिस (सर्व रा. मानवतानगर) यांच्यासोबत बुंदेल यांचा १२०० रुपयांच्या उधारीवरून वाद होता. त्यांच्यात यापूर्वी कुरबूरही झाली होती. रविवारी रात्री १०.३० वाजता बुंदेल आणि आरोपी हे गिट्टीखदानमधील बेडिवाले दर्गाहजवळ समोरासमोर आले. आरोपींनी बुंदेल यांना १२०० रुपये परत मागितल्याने त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर चारही आरोपींनी आधी हातबुक्की आणि लाठीने बुंदेल यांना मारहाण केली. नंतर त्यांना दगडविटाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेला. जबर जखमी झालेल्या बुंदेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी बुंदेल यांचे बयाण नोंदविले. शालिनी मनोजसिंग बुंदेल (वय २८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी सुरू आहे.