शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

चेंडूने कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 9:41 PM

कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.शेख वसीम शेख मुसा (वय २६) तसेच तमासर रहमत वसीम अहमद ( वय २४) अशी आरोपींची नावे आहेत. वसीम गिट्टीखदानमधील अहबाब चौकात तर अहमद मानकापूरच्या ताज नगरमध्ये राहतो. अमली पदार्थाचे व्यसन असलेल्या आणि कारागृहात बंद असलेल्या सराईत गुन्हेगारांना हे दोघे नियमित वेगवेगळ्या मार्गाने अमली पदार्थ पोहोचवितात. रविवारी सायंकाळी वसीम आणि अहमद हे दोघे कारागृहाच्या मागच्या बाजूला उभे राहिले. त्यांनी टेनिस बॉलमध्ये गांजा भरला आणि गांजाने भरलेला हा बॉल फेविकॉलने चिपकवून तो त्यांनी भिंतीवरून आत फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा तसेच मोबाईल आणि दुचाकी असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :jailतुरुंगnagpurनागपूर