शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पोलीस शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न,  नागपूरच्या शताब्दी चौकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:02 AM

Attempt to crush a police constable, crime news भरधाव कारचालकाने चाैकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शताब्दी चौकात शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेचा शिपाई गंभीर जखमी ,  कारचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भरधाव कारचालकाने चाैकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शताब्दी चौकात शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. कारची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव नितीन वरठी असून ते खासगी इस्पितळात अतिदक्षता कक्षात दाखल आहेत.

वाहतूक शाखा अजनीच्या भरारी पथकात कार्यरत असलेले नितीन वरठी शनिवारी सकाळी १०.३० वाजता शताब्दी चौकात कर्तव्यावर होते. सिग्नल बंद असताना चौकाच्या मधोमध एक कार येऊन थांबली. कारला समोर नंबरप्लेट नसल्याने वरठी यांनी कारच्या समोर जाऊन चालकाला कार बाजूला घेण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने अचानक गती वाढवून कार वरठी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. जोरदार धडक लागल्याने वरठी फुटबॉलसारखे उसळून डोक्याच्या भारावर पडले. या घटनेमुळे चौकात प्रचंड थरार निर्माण झाला. जखमी पोलीस रस्त्यावर पडलेला असताना आरोपी कारचालक तेथून पळून गेला. आजूबाजूच्यांच्या मदतीने वरठीला देवनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, कारचालकाने वाहतूक शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली. एएसआय गजानन साधनकर यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

आरोपीच्या शोधासाठी दोन पथके

पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी कारचालकाचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकाने मानेवाडा ते प्रतापनगर मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तर, दुसऱ्या पथकाने कार विक्रेत्यांकडून एवढ्यात पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सान कार कुणाकुणाला विकली, त्याचा शोध चालविला आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात येईल, असा दावा ठाणेदार विनोद चाैधरी यांनी केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी