शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा केंद्रीय पथकासमाेर आक्राेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/माैदा/पारशिवनी : ऑगस्टमध्ये कन्हान व पेंच नदीला आलेल्या पुरामुळे कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा) गावाला जबर फटका ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी/माैदा/पारशिवनी : ऑगस्टमध्ये कन्हान व पेंच नदीला आलेल्या पुरामुळे कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा) गावाला जबर फटका बसला हाेता. केंद्रीय पथकाने गुरुवारी (दि. २४) या गावासह पारशिवनी व माैदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात साेनेगाव (राजा) येथील पूरग्रस्तांनी आक्रमक हाेत गावाचे पुनर्वसन करण्याची तसेच त्यासाठी शासनाने घरबांधकामाला जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली हाेती.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्याने कन्हान व चाैराई धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पेंच नदीला माेठा पूर आला हाेता. पेंच नदी कन्हान नदीत बिना संगम येथे विलीन हाेत असल्याने या पुराने साेनेगाव (राजा)ला चारही बाजूंनी वेढले हाेते. या पुरामुळे साेनेगाव (राजा) येथील ५४ नागरिकांच्या घरांमधील जीवनावश्यक साहित्याच्या नुकसानासाेबतच ६४ घरांची पडझड झाल्याने माेठे नुकसान झाले हाेते. शिवाय, येथील २२५ हेक्टरमधील पिकांना पुराचा जबर फटका बसला हाेता.

शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही केली. मात्र, साेनेगाव (राजा)ला वारंवार पुराचा धाेका उद्भवत असल्याने या गावाचे पुनर्वसन करून ही समस्या कायमस्वरूपी साेडविण्याची मागणी जिजाबाई गजभिये (६०) यांच्यासह अन्य महिला व नागरिकांनी रेटून धरली हाेती. अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करीत त्यांना मिळालेल्या शासकीय मदतीबाबत विचारणा केली.

या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार घंटा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य अभियंता महेंद्र सहारे, तुषार व्यास, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार अरविंद हिंगे यांचा समावेश हाेता. यावेळी तहसीलदार दिनेश निंबाळकर, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, मौद्याच्या मुख्याधिकारी कोमल कराळे, तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सोनेगावचे सरपंच चंद्रकांत हेवट उपस्थित हाेते.

....

पुराचा धाेका कायम

कन्हान नदीच्या तीरावर असलेल्या साेनेगाव (राजा)ला दरवर्षी पुराचा फटका बसताे. सन १९९४ साली आलेल्या पुराने गावाला वेढले हाेते. तेव्हापासून येथील नागरिकांनी गावाच्या पुनर्वसनाची मागणी करायला सुरुवात केली. यासाठी शासनाने गावाशेजारी साडेपाच एकर जागा मंजूर केली व पट्टे देण्याची ग्वाही दिली. १७० कुटुंबीयांना अद्यापही पट्टे न मिळाल्याने त्यांनी मूळ गाव साेडले नाही.

...

नुकसान भरपाईची प्रतीक्षा

या पथकाने राहुल महल्ले यांच्या शेताची पाहणी केली. त्यांनी ते शेत ठेक्याने केले असून, पुरामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले. शासनाकडून काेणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पुरात मधुकर चौधरी यांची एक गाय वाहून गेली. त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही. नामदेव ढोले, बंडू चौधरी यांच्यासह इतरांनी पट्टे मिळवून देण्याची मागणी केली.

....

ब्रिटिशकालीन पुलाचे नुकसान

या पुरामुळे माथनी (ता. माैदा) शिवारातील ब्रिटिशकालीन पुलाचे माेठे नुकसान झाल्याने हा पूल चार महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे माथनी व चेहळी येथील नागरिकांना पाच किमीचा वळसा घेऊन माैद्याला यावे लागते. कन्हान नदीतील इन्टेक विहिरीतून माैदा शहराला पाणीपुरवठा केला जाताे. पुरामुळे या विहिरीचेही नुकसान झाले असून, साहित्य वाहून गेले. पथकाने पूल व विहिरीची पाहणी केली.

...

पूल गेला वाहून

पेंच नदीला आलेल्या पुरात पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली दरम्यानचा पूल वाहून गेल्याने तालुक्याचा रामटेक तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पुलाचे बांधकाम २०१८ मध्ये १२ काेटी रुपये खर्च करून करण्यात आले हाेते. अधिकाऱ्यांनी या पुलासह सिंगारदीप व नीलज (खंडाळा) येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

...