माओवादी समर्थक रेजाझ सिद्दीकीचा तपास एटीएसकडे!

By योगेश पांडे | Updated: May 16, 2025 23:18 IST2025-05-16T23:17:02+5:302025-05-16T23:18:19+5:30

Rejaz Siddiqui: एटीएस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिद्दीकीला ताब्यात घेतले आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली.

ATS to investigate Maoist supporter Rejaz Siddiqui | माओवादी समर्थक रेजाझ सिद्दीकीचा तपास एटीएसकडे!

माओवादी समर्थक रेजाझ सिद्दीकीचा तपास एटीएसकडे!

योगेश पांडे, नागपूर: नक्षलवादी आणि काश्मीर फुटीरतावाद्यांशी संबंधित रेजाझ सिद्दीकीच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिद्दीकीला ताब्यात घेतले आणि प्रकरणाशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली.

केरळमधील एर्नाकुलम येथील रहिवासी २६ वर्षीय रेजाझ सिद्दीक याला ७ मे रोजी लकडगंज पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मारवाडी चौकातील हॉटेल प्राइममध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत पकडण्यात आले होते. त्याने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्यावर टीका केली होती. तेव्हापासून सिद्दीकी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात होता. 

सिद्दीकी नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे त्याच्या घरी आढळलेल्या कागदपत्रांतून समोर आले. त्याने नक्षलवाद्यांसाठी आर्थिक मदत गोळा केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचे काश्मीरच्या जेकेएलएफशी असलेले संबंधही उघड झाले आहेत. नक्षलवादी कार्यकर्त्यांमध्ये त्याचे एक मोठे नाव आहे. त्याचे अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांशी आणि समर्थकांशी संबंध आहेत. तो गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना भेटण्यासाठी नागपूरला येत होता. २०१७ आणि २०२२ मध्ये नागपूरला पोहोचला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आता एटीएसकडून चौकशीदरम्यान सिद्दीकीकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: ATS to investigate Maoist supporter Rejaz Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.