शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

उपराजधानीत अस्थमाच्या रुग्णांत १५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:19 IST

नागपूर शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व वाढलेली थंडी, अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे.

ठळक मुद्देथंडी, प्रदूषण ठरत आहे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व वाढलेली थंडी, अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये अस्थामाच्या रुग्णांत १५-२० टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यात शहरीसोबतच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. केवळ मेयो, मेडिकलच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही रुग्ण दिसून येत आहे.धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सिमेंटचे जंगल म्हणून ओळख झालेल्या नागपुरातही प्रदूषणाची कमी नाही. सध्या धडाक्यात सुरू असलेले मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. थंडीमुळे ही धूळ खालीच राहत असल्याने याचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.दुसरीकडे उब येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. अनेक लोक सर्रास टायर, प्लास्टिक जाळतात. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. यात थंडी वाढल्याने नागपुरात अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात लहान मुलांसोबतच वयोवृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ते म्हणाले, ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आकुंचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ही लक्षणे दिसणाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांनुसार या महिन्यात बाह्यरुग्ण विभागात अस्थामाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक रुग्णांशी चर्चा केल्यावर त्यांनी घराच्या बाजूला सुरू असलेले बांधकाम व त्यातून निघणारी सततची धूळ, जळणारा कचरा हे कारण सांगितले आहे.

१०० मधून १५ ते २० रुग्ण अस्थमाचेदिवाळीनंतर अस्थमाच्या रुग्णांत दरवर्षी वाढ होते. या वर्षीही झाली आहे, परंतु प्रमाण वाढले आहे. धूळ प्रदूषण व थंडी याला कारणीभूत आहे. सध्या रुग्णालयात १०० रुग्णांमध्ये १५ ते २० रुग्ण अस्थमाचे येत आहेत.- डॉ. अशोक अरबटवरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट

टॅग्स :Healthआरोग्य