जीव जाईपर्यंत केले वार : तीन शस्त्रांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:32 PM2020-05-13T21:32:36+5:302020-05-13T21:34:55+5:30

‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. नंदनवन पोलिसांनी त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.

Assault to death: Use of three weapons | जीव जाईपर्यंत केले वार : तीन शस्त्रांचा वापर

जीव जाईपर्यंत केले वार : तीन शस्त्रांचा वापर

Next
ठळक मुद्दे१६ मेपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. नंदनवन पोलिसांनी त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.
हिवरीनगर येथील रहिवासी रेशन व्यापारी विलास भुजाडेने मंगळवारी मध्यरात्री २९ वर्षीय पत्नी श्रुती भुजाडे हिचा गळा कापून खून केला. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले. विलासला पाच वर्षाची मुलगीही आहे. त्याचा श्रुतीसोबत वाद सुरू होता. श्रुती मोबाईलवर मैत्रिणी व इतरांशी बोलत असे. ती अनेकदा व्हिडिओ कॉलही करायची. फेसबुकवर ती अ‍ॅक्टिव्ह राहत होती. यामुळे विलासला श्रुतीचे तिच्या कॉलेजमधील जुन्या मित्रांशी नाते असल्याचा संशय आला होता. तो तिच्यावर पाळत ठेवू लागला होता. तिला मोबाईल व फेसबुकपासून दूर राहायला सांगायचा, परंतु जेव्हाही रिकामा वेळ मिळत असे श्रुती मोबाईलवर बोलत असायची. यामुळे विलासचा संशय आणखी वाढला होता. मंगळवारी रात्रीपासूनच दोघांमध्ये वाद सुरू होता. रात्री ३ वाजता विलासने श्रुतीची हत्या केली. त्याने स्वयंपाक घरातील चाकू, वस्तरा आणि चॉपरने श्रुतीचा गळा कापला. त्याने तिचा जीव जाईपर्यंत वार केले. यात त्याचा हातही कापला गेला. परंतु त्याचे वार करणे सुरूच होते.
खून केल्यानंतरही विलासच्या मनात प्रचंड राग आहे. यामुळे पोलीस त्याची विचारपूस करताना अतिशय संयम ठेवत आहे. पोलीस श्रुतीचे मोबाईल व सोशल मीडिया अकाऊंटचीही तपासणी करणार आहे. त्यानंतरच खरे कारण समोर येऊ शकेल. या घटनेमुळे सर्वाधिक फटका त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला बसला आहे. ती नेहमीसाठी आईपासून पोरकी झाली आहे आणि वडीलही तुरुंगात गेले आहेत. तपास अधिकारी पीएसआय काळुसे यांनी विलासला आज न्यायालयात सादर करीत १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. या घटनेमुळे विलास व श्रुतीच्या कुटुंबीयांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

Web Title: Assault to death: Use of three weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.