शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

अस्मिताच आपली खरी ओळख असते

By admin | Updated: June 15, 2014 00:41 IST

माझी श्रद्धा माझ्या विचारांवर, माणुसकीवर आणि माझ्या कामावर आहे. काम चांगले असले पाहिजे, कुणाचेतरी दु:ख दूर करणारे असले पाहिजे, हाच माझा आग्रह आहे. खूपच सोपे आहे सगळे. मी अमूकवादी की

अनिल अवचट : अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात प्र्रगट मुलाखत
नागपूर : माझी श्रद्धा माझ्या विचारांवर, माणुसकीवर आणि माझ्या कामावर आहे. काम चांगले असले पाहिजे, कुणाचेतरी दु:ख दूर करणारे असले पाहिजे, हाच माझा आग्रह आहे. खूपच सोपे आहे सगळे. मी अमूकवादी की तमूकवादी असा प्रश्न बरेच लोक करतात पण मला हा शब्दच पटत नाही. कट्टरतेची मला भीतीच वाटते. कट्टरता कुठलीही असो, ती वाईटच. आपली अस्मिताच महत्त्वाची असते, ती जपता आली पाहिजे. कारण आपली अस्मिताच आपली खरी ओळख असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात आज डॉ. अनिल अवचट यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली. हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर, सिव्हील लाईन्स येथे पार पडला. अवचट म्हणाले, कट्टर असणे म्हणजे आपल्या विचारांवर, दृष्टीवर झापड लावून घेण्यासारखे आहे. हा संकुचितपणा मला जमलाच नाही. लोक गरीब आणि श्रीमंत असा भेद करतात. समाजात ते दिसतेही. पण यातील माणूस महत्त्वाचा नाही का? तोच हरवतोय असे वाटतेय. प्रादेशिक ताही मला मान्य नाही. हा देश आपला आहे आणि सगळीकडेच माणसे राहतात ना. ती नाही का दिसत आपल्याला. त्यामुळेच विदर्भ, महाराष्ट्र असल्या सीमांमध्ये मी फारसा अडकत नाही, बरे आहे बुवा तेच. काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत ना, त्या करूच नये म्हणजे आपण आनंदी राहतो, असे ते म्हणाले. पण जे आपण करू शकतो, जे चांगले आणि समाजाला उपकारक असेल, ते मात्र चांगल्या पद्धतीने करता यावे म्हणून विचार करायला हवा.
डॉक्टर वगैरे होण्याचे माझे इतरांसारखे स्वप्न नव्हते. मनासारखे वागायला आवडत होते. वडिलांचा आग्रह म्हणून डॉक्टर झालो. मनात मत्सर नसला तर मनही दगा देत नाही. राम मनोहर लोहिया विचारांसाठी प्राण देऊ शकतात तर आपण आपल्या विचारांसाठी जगूही शकत नाहीत का, असा प्रश्न युवावस्थेतच मनात आला. भावनाविहीन आणि संवेदना नसलेल्यांना माणूस कसे म्हणायचे. अशाच समविचारी युवकांचा युक्रांत नावाचा समूह तयार झाला. यातून नंतर चळवळच उभी राहिली. बिहार आणि तिथल्या कुपोषणाविषयी लघुपट पाहिला आणि तिकडे वळलो. बेबंद सरंजमशाही व्यवस्थेत कुपोषणात पिचल्या जाणारा समाज पाहिला. वेदना झाल्या, हादरून गेलो. दृष्टीच या घटनेने बदलली. पोटात अन्न नसले तर औषधही काम करीत नाही. अभिव्यक्त होण्यासाठी लिहायला लागलो. आधीच समाजाच्या दृष्टीने वेडा आणि त्यात लिहायला लागलो. पण माझ्यासारख्या वेड्यांना ते आवडायला लागले. लिखाणातून अनेक विषय आणि वास्तव लोकांपर्यंत पोहोचवित राहिलो. राम पटवर्धन यांनी या वास्तववादी लेखनाला प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच माझे लिखाण होत राहिले, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)