नागपुरात वळीवाच्या पावसाचे आगमन; उकाड्यापासून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 17:31 IST2022-05-24T17:30:54+5:302022-05-24T17:31:40+5:30
Nagpur News गेल्या दोन दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या विदर्भवासियांना मंगळवारी दुपारनंतर आलेल्या वळिवाच्या पावसाने जरा दिलासा दिला.

नागपुरात वळीवाच्या पावसाचे आगमन; उकाड्यापासून दिलासा
ठळक मुद्देमोठी झाडे पडली
नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या विदर्भवासियांना मंगळवारी दुपारनंतर आलेल्या वळिवाच्या पावसाने जरा दिलासा दिला. पावसाआधी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यालगतची झाडे पडून वाहनांचे नुकसान झाले.
गेल्या आठवड्यापासून साधारणपणे ४२ ते ४४ अंशादरम्यान असलेल्या तापमानामुळे विदर्भात काहिली होत होती. नागरिक, पाळीव प्राण्यांसह वन्य पशूंनाही या उन्हाचा तडाखा असहनीय झाला होता. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना या वळीवाच्या पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे.