शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रतापनगरातील आरोपींचा पीसीआर : हुडकेश्वरमधील चारपैकी एक आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्­वर पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास आरोपी विक्रम हुकुमबहादुर कार्की आणि त्याचा साथीदार रामू बहादुर गोमासे यांनी कार्तिक लक्ष्मण सारवे (वय ३५, रा. गोपाल नगर) याची भीषण हत्या केली होती. पोलिसांनी सहा तासात दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच लोखंडी रॉड जप्त केला. आज या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी विक्रम याच्या विवाहित बहिणीसोबत मृत कार्तिक सारवे याचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे आरोपीने कार्तिक याला तिच्याशी संबंध तोडून टाकण्यासाठी अनेकदा बजावले होते. मात्र तो ऐकत नसल्यामुळे अखेर विक्रमने साथीदाराच्या मदतीने कार्तिक सारवेची हत्या केली.हुडकेश्वरमध्ये वैभव सुरेश मुरते (३४) याची आरोपी कुणाल बच्छेरे याने त्याच्या तीन साथीदारांसह गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केली होती.या घटनेला अवैध सावकारीतून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. मृत वैभव हा अवैध सावकारी करीत होता. आरोपी कुणाल बछेरे याने वैभवकडून ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कुणालने गेल्या तीन महिन्यांपासून व्याजाचा एकही रुपया वैभवला दिला नव्हता. त्यामुळे वैभव आणि कुणालच्या संबंधात तेढ निर्माण झाले होते. मुद्दल नाही तर व्याजाची तरी रक्कम मिळावी म्हणून वैभव कुणालला सारख्या शिव्या द्यायचा. चारचौघात अपमान करायचा आणि धमक्याही द्यायचा. त्यामुळे कुणाल प्रचंड चिडून होता. यातूनच त्याने वैभवच्या हत्येचा कट रचला. कुणालने रितिक मांझी, गोपाळ त्रिवेदी तसेच निरंजन साळवेला सोबत घेऊन वैभवची भीषण हत्या केली.अटक केल्यानंतर आरोपी कुणालने हुडकेश्वर पोलिसांना सांगितल्यानुसार, वैभव त्याला पैशासाठी प्रचंड त्रास देत होता चारचौघात अपमान करत होता, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दारूच्या नशेत असलेल्या मित्रांना त्याने दोन दिवसांपूर्वी ही बाब सांगितली. तो आपल्याला ठार मारणार आहे, असे सांगितल्यामुळे आरोपी रितिक, गोपाळ आणि निरंजन याने 'तू कशाला मरतो, त्याचेच काम करू' असे म्हटले. त्यामुळे चौघांनी संगणमत करून वैभवला गुरुवारी सायंकाळी निर्घृणपणे ठार मारले. या प्रकरणात आरोपी निरंजन वगळता अन्य तिघांना अटक केली असून, निरंजनचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक