चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

By दयानंद पाईकराव | Updated: September 6, 2023 14:48 IST2023-09-06T14:48:03+5:302023-09-06T14:48:40+5:30

अजनी पोलिसांची कारवाई

Armed with a knife, the police put him in jail | चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

नागपूर : हत्तीमार चाकु घेऊन धुमाकुळ घालणाऱ्या आरोपीला अजनी पोलिसांनी गजाआड केले आहे. अलेक्झांडर उर्फ अ‍ॅलेक्स पॅट्रीक्स अब्राहम (वय ३६, रा. म्हाडा कॉलनी, पिटेसुर रोड, गोधणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बुधवारी सहा सप्टेंबरला रात्री १.५० वाजताच्या सुमारास अजनी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. तेवढ्यात रामेश्वरीच्या गल्ली नं. १ येथे सार्वजनिक सिमेंट रस्त्यावर एक आरोपी हातात हत्तीमार चाकू घेऊन धुमाकुळ घालत असताना दिसला. त्याला घेराव घालून पोलिसांनी त्याच्या जवळून ३०० रुपये किमतीचा हत्तीमार चाकू जप्त केला. आरोपीने सह पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या विरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Web Title: Armed with a knife, the police put him in jail