फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: November 13, 2023 15:01 IST2023-11-13T15:01:12+5:302023-11-13T15:01:39+5:30

यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Argument while playing football, 14-year-old boy dies after being slapped by player | फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

फुटबॉल खेळताना वाद, खेळाडूने झापड मारल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर : फुटबॉल खेळताना झालेला वाद एका खेळाडूच्या जीवावर बेतला. वाद वाढल्यावर त्याला दुसऱ्या मुलाने झापड माररी व काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.

मोहम्मद इब्राहिम उर्फ मोहम्मद फिरोज शेख (१४, गरीब नवाज नगर) असे मृतकाचे नाव आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी तो मैदानात इतर मुलांसोबत फुटबॉल खेळत होता. खेळताना त्याचे एका मुलाशी भांडण झाले. वाद वाढल्यावर समोरील मुलाने मोहम्मद इब्राहिमच्या मानेजवळ झापड मारली. त्यानतंर तो चक्कर येऊन मैदानातच खाली पडला व बेशुद्ध झाला. त्याला तेथील मुलांनी तातडीने उपचारासाठी मदन इस्पितळात नेले. मात्र तेथून त्याला मेयो इस्पितळात पाठविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकाराने त्याचे वडील मोहम्मद फिरोज शेख उर्फ मोहम्मद ईरा (४८) यांच्यासह कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांच्या सूचनेवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Argument while playing football, 14-year-old boy dies after being slapped by player