लहान मुलाला शिवीगाळ केल्याने टोकले, आरोपीने वडिलांनाच भोसकले

By योगेश पांडे | Updated: November 3, 2023 17:40 IST2023-11-03T17:40:30+5:302023-11-03T17:40:38+5:30

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

argument over abusing the child, accused stabbed the father with knife | लहान मुलाला शिवीगाळ केल्याने टोकले, आरोपीने वडिलांनाच भोसकले

लहान मुलाला शिवीगाळ केल्याने टोकले, आरोपीने वडिलांनाच भोसकले

नागपूर : घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलाला अगोदर एका आरोपीने शिवीगाळ केली. त्यावरून त्याच्या वडिलांनी हटकल्यावर त्यांच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी करण्यात आले. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विक्की उर्फ मयुर कैलास वर्मा (२७, प्रेमनगर, झेंडा चौक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराजवळ मयुर वर्मा (३७) हे राहतात. सायंकाळी त्यांचा ११ वर्षीय मुलगा घराबाहेर खेळत असताना विक्कीने त्याला विनाकारण रागावले व शिवीगाळ केली. हे पाहताच वर्मा यांनी त्याला हटकले. यावर विक्की संतापला व त्याने वर्मा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने खिशातून चाकू काढत वर्मा यांच्याकडे धाव घेतली व त्यांच्या पाठीत वार केले. यात वर्मा जखमी झाले. यानंतर आरोपी फरार झाला. वर्मा यांना शेजारी व नातेवाईकांनी मेयो इस्पितळात नेले. त्यांच्या तक्रारीवरून विक्कीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: argument over abusing the child, accused stabbed the father with knife