शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

मेयोतील  एमबीबीएसच्या ५० जागांना अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:43 PM

मेयोच्या वाढीव एमबीबीएसच्या ५० जागांसाठी उपलब्ध सोयींची तपासणी करतेवेळी ‘एमसीआय’ चमूने यंत्रसामुग्री व अल्प मनुष्यबळासह एकूण १३ त्रुटी काढल्या. परिणामी, वाढीव जागा धोक्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी व संचालकांनी त्रुटी दूर करण्याचे हमीपत्र दिल्याने अखेर या जागेला मंजुरी मिळाली.

ठळक मुद्देसचिव व संचालकांनी दिले हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेयोच्या वाढीव एमबीबीएसच्या ५० जागांसाठी उपलब्ध सोयींची तपासणी करतेवेळी ‘एमसीआय’ चमूने यंत्रसामुग्री व अल्प मनुष्यबळासह एकूण १३ त्रुटी काढल्या. परिणामी, वाढीव जागा धोक्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी व संचालकांनी त्रुटी दूर करण्याचे हमीपत्र दिल्याने अखेर या जागेला मंजुरी मिळाली.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे गेल्या अनेक वर्षांपासून पायाभूत सोयी, अल्प मनुष्यबळ व यंत्र सामुग्रींना घेऊन अडचणीत येत आहे. सुरुवातीला १३ वर्षे मेयोच्या एमबीबीएस १०० जागांमधील ४० जागांना घेऊन भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) त्रुटी काढीत आली होती. यामुळे मेयो प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले होते. २०१४ मध्ये शासनाच्या नव्या धोरणानुसार मेयोच्या ५० जागा वाढविल्याने ४० जागांचा प्रश्न मागे पडला. मेयोच्या एमबीबीएसच्या जागा १०० वरून १५० झाल्या. परंतु ‘एमसीआय’च्या मानकानुसार अद्यापही पदे भरण्यात आलेली नाही. यामुळे आता एमबीबीएसच्या वाढीव ५० जागांना घेऊन गोंधळ सुरूच आहे. विशेष म्हणजे, मेयोला पाच सहयोगी प्राध्यापक व ११ सहायक प्राध्यापक पदाची गरज असताना यातील तिघांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. यामुळे अडचणी वाढल्या. शिवाय ‘एमसीआय’च्या निकषाप्रमाणे ‘१६ स्लाईस सीटी स्कॅन’ यंत्र नाही. मेयोत ‘ड्युअल स्लाईस’चे तेही कालबाह्य झालेले सिटी स्कॅन आहे. ‘एमआरआय’ही नाही. यावर ताशेरे ओढत एप्रिल महिन्यात एमसीआयने मेयो प्रशासनाला पत्र पाठवून एमबीबीएसच्या ५० जागा का कमी करता येऊ नये, अशा आशयाचे पत्रच पाठविले. याची माहिती अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ‘दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण कार्यक्रमात आपल्या भाषणातून दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची नोंद घेतली. त्यांच्या प्रयत्नामुळेचशिर्डीच्या साईबाबा संस्थेने एमआरआय, सिटीस्कॅनसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी ३५ कोटी २२ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. नुकताचा हा निधी मेयोच्या तिजोरीत जमा झाला. यातच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख व संचालक डॉ. प्रवीन शिनगारे उर्वरित त्रुटी दूर करण्याचे हमीपत्र दिल्याने ‘एमसीआय’ने ५० जागांना मंजुरी दिली. यामुळे मेयो प्रशासनाने तूर्तास तरी सुटकेचा नि:श्वास टाकला असलातरी अल्प मनुष्यबळाची समस्या अद्यापही कायम आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर