शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेवरील नियुक्त्या घटनाबाह्यच

By admin | Updated: June 12, 2014 01:06 IST

एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार,

नागपूर : एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार अशा घटनांत सातत्याने वाढ होते आहे. यामागे समतेच्या अधिष्ठानावर कारभार न चालणे आणि समाजातली सांस्कृतिक जाण कमी होणे आहे. यामुळेच असांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली आहे आणि हिंसक वृत्ती निर्माण होते आहे. या मुद्यांकडे लक्ष दिले जावे आणि समाजातील प्रतिभावंतांची मते लक्षात घ्यावी म्हणून घटनेने विधान परिषदेवर प्रतिभावंत, तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या जागांवर राजकीय नेत्यांचीच वर्णी लागते आहे.
यंदाही विधान परिषदेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या या घटनाबाह्य असून यासंदर्भात अनेकदा निवेदन दिल्यावरही शासनाने घटनाबाह्य नियुक्त्या करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ही घटनेचा अवमान करणारी बाब असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाने धर्म, संप्रदाय, संस्कृती यातील विवेक, सहिष्णुता आणि प्रागतिक मूल्यांशी संपर्कच तोडला आहे. राज्याच्या निर्मितीपासून विधान परिषदेवर आतापर्यंत राज्यपालांच्या अधिकारातील १२ नियुक्त्या राज्यघटनेचा भंग करूनच करण्यात आल्या आहेत. घटनेत समाज, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसाठी राखीव जागांवर राजकारण्यांनीच डाव साधला. यामुळे या क्षेत्रातील नियुक्त्यांच्या संदर्भाच मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. या बाबीकडे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे लक्ष आघाडीने वेधले आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात आघाडीच्यावतीने न्यायालयाच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली आहे.
या बैठकीला विलास भोंगाडे, किशोर दिवेकर, डॉ. चंद्रभान भोयर, रवींद्र फडणवीस, विलास जांभुळकर, प्रकाश दुलेवाले, शरद ठाकरे, ज्ञानेश्वर वांढरे, अरुण वनकर, अरुण लाटकर, योगेश ठाकरे, परसराम राऊत, अ‍ॅड. अविनाश काळे आदी अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)