शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रा पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: March 5, 2016 03:05 IST

आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला.

आकाश शेंडे अपहरण आणि हत्या : प्रतापनगरात प्रचंड तणावनागपूर : आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सुभाषनगरात सायकल स्टोर्स चालवणाऱ्या आकाशचा काही तरुणांसोबत उधारीच्या पैशातून वाद सुरू होता. त्यामुळे ४ फेब्रुवारीला आरोपींनी त्याला दुकानात येऊन मारहाण केली होती. यावेळी कुटुंबीयांनी आरोपींची समजूत काढून १ मार्चला पैसे देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, तत्पूर्वीच २९ फेब्रुवारीला दुपारी शेंदरे, ढवळे आणि आणखी पाच-सात आरोपी आकाशच्या दुकानात आले आणि पैशाची मागणी करू लागले. पैसे काही दिवसात देतो, असे सांगणाऱ्या आकाशला आरोपींनी दुकानातून उचलून नेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या अपहरणाची तक्रार घेऊन गेलेल्या कुटुंबीयांना प्रतापनगर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. गुरुवारी प्रतापनगर पोलिसांना अंबाझरी तलावात आकाश शेंडेचा मृतदेह सापडला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मेडिकलमध्ये बोलावून पोलिसांनी शेंडे कुुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. मात्र, आकाशचे अपहरण करून त्याची हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी संतप्त शेंडे कुटुंबीयांनी केली अन् आरोपींना अटक केल्याशिवाय आकाश शेंडेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगितले. त्यावेळी शेंडे कुटुंबीयांची पोलिसांनी कशीबशी समजूत घातली. मात्र, पोलिसांवरच प्रकरण दडपण्याचा संशय घेऊन शोकसंतप्त शेंडे कुटुंबीय नातेवाईक, मित्र तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी आकाश शेंडेची अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावग्रस्त झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन पोलिसांनी समजूत काढली.(प्रतिनिधी)