शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ

By admin | Updated: May 13, 2014 00:22 IST

नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर वैफल्यातून हल्ला केला. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ आणि नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ,

ंवैफल्यातून हल्ला : गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रतिक्रिया

ंनागपूर : नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर वैफल्यातून हल्ला केला. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ आणि नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. मुरमुरी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवून नक्षल्यांनी रविवारी सकाळी पोलिसांचे वाहन उडवून दिले. या स्फोटात सात पोलीस शहीद झाले. तर हेमंत बनसोडे (३0) आणि पंकज सिडाम (२९) हे दोघे जबर जखमी आहेत. स्थानिक ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये ते भरती आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री आज रात्री ७.४५ वाजता इस्पितळात पोहोचले.

जखमी जवानांना बघितल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गृहमंत्र्यांनी मात्र कोणत्याच प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही. राज्य पोलीस दलाला हादरा देणार्‍या या घटनेमागे कोण आहे, असा प्रश्न केला असता चौकशी सुरू आहे, शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील प्रो. साईबाबा यांच्या अटकेचा आणि या घटनेचा काय संबंध आहे, या प्रश्नावर त्यांनी ‘आता काही बोलणे योग्य होणार नाही’, असे उत्तर दिले.

गावाजवळच हा हल्ला झाला, हा पोलिसांचा हलगर्जीपणा नाही काय, असे विचारले असता त्यांनी ठाम इन्कार केला. तीन ते चार दिवस सतत ३0 ते ४0 किलोमीटर जंगलात फिरल्यानंतर थकवा येणे स्वाभाविक आहे. त्यांना घेण्यासाठी जेथे वाहने ठेवलीती सुरक्षित अंतरावरच होती; तरीसुद्धा नक्षल्यांनी डाव साधला.

पोलिसांकडून वारंवार शह मिळत असल्याने आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच त्यांनी हा भ्याडहल्ला केल्याचे गृहमंत्री म्हणाले. या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल घसरणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहो.

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, असेही गृहमंत्री पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)