शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’विरुद्ध हायकोर्टात दुसरी याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:48 IST

रियल इस्टेट (रेग्युलेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट-२०१६ (रेरा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसरी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

शासनाला नोटीस : काही तरतुदी घटनाबाह्य असल्याचा दावालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रियल इस्टेट (रेग्युलेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट) अ‍ॅक्ट-२०१६ (रेरा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसरी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. कायद्यातील कलम ३(१), कलम ३(२)(ए) व कलम ४(२)(एल)(डी) घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीने ही याचिका दाखल केली आहे. सोसायटीचा एक गृहप्रकल्प पूर्ण झाला असून पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी २७ मार्च २०१२ रोजी महानगरपालिकेकडे अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, सोसायटीला अद्याप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची ‘रेरा’ अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. त्यावर सोसायटीचा आक्षेप आहे. गृहप्रकल्प पूर्ण झाला असताना व ८० टक्के घरांचा ग्राहकांनी ताबा घेतला असताना केवळ मनपाच्या चुकीमुळे ‘रेरा’ अंतर्गत नोंदणी करण्याची सक्ती करता येणार नाही. हा कायदा पूर्ण झालेल्या व निर्माणाधीन प्रकल्पांना बंधनकारक करू नये व याचिका प्रलंबित असेपर्यंत प्रकल्पाच्या नोंदणीची सक्ती करू नये असे सोसायटीचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांनी शुक्रवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर अ‍ॅटर्नी जनरल, केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव, राज्याच्या नगर विकास विभागाचे सचिव व रिअल इस्टेट रेग्युलेटरी आॅथोरिटी यांना नोटीस बजावून २६ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश रणदिवे व अ‍ॅड. अश्विनी कठाणे यांनी कामकाज पाहिले.