नागपुरात आणखी एक हत्या, तरुणाला दगडाने ठेचले

By योगेश पांडे | Updated: May 3, 2024 02:11 IST2024-05-03T02:11:24+5:302024-05-03T02:11:50+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरे (२२, आयसी चौक) असे आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते.

Another murder in Nagpur, youth stoned | नागपुरात आणखी एक हत्या, तरुणाला दगडाने ठेचले

नागपुरात आणखी एक हत्या, तरुणाला दगडाने ठेचले

नागपूर : वानाडोंगरी परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह आढळल्याने हा प्रकार समोर आला. वानाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव कुणाल उर्फ बॅटरी सुनिल कन्हेरे (२२, आयसी चौक) असे आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते. सायंकाळच्या सुमारास वानाडोंगरी संगम रोडच्या बाजुला असलेल्या वृंदावन ले आऊटच्या पाठीमागील बाजूस त्याचा मृतदेह दिसला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता. सीसीटीव्ही व इतर माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून ते पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
 

Web Title: Another murder in Nagpur, youth stoned