नागपुरात रात्री उशिरा एकाची हत्या; पैशांच्या वादातून हल्ला

By योगेश पांडे | Updated: February 10, 2024 05:50 IST2024-02-10T05:50:23+5:302024-02-10T05:50:53+5:30

नीरज व त्याचा मित्र विशाल राऊत (३२) वर आरोपींनी हल्ला करत वार केले

Another murder in Nagpur, attack over money dispute | नागपुरात रात्री उशिरा एकाची हत्या; पैशांच्या वादातून हल्ला

नागपुरात रात्री उशिरा एकाची हत्या; पैशांच्या वादातून हल्ला

नागपूर : पैशांच्या तसेच दारू पिण्याच्या वादातून नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली. तर एक जण गंभीर जखमी झाला. नंदनवन येथील संघर्षनगर झोपडपट्टीजवळ हा प्रकार घडला. नीरज भोईर (३०) असे मृतकाचे नाव आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नीरज व त्याचा मित्र विशाल राऊत (३२) वर आरोपींनी हल्ला करत वार केले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजून आरोपी फरार झाले. दोघाही जखमींना दवाखान्यात नेण्यात आले. मात्र नीरजला मृत घोषित करण्यात आले. तर विशालची प्रकृती गंभीर आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांचा पंचनामा सुरूच होता. या घटनेची माहिती मिळताच शाखेचे उपायुक्त निमित गोयल, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर घटनास्थळी पोहोचले. फेब्रुवारी गुन्हे महिन्यातील ही पाचवी हत्या असून यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

Web Title: Another murder in Nagpur, attack over money dispute