शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ये अनिल देशमुखजी का नंबर है क्या?... असा आला होता गृहमंत्र्यांना धमकीवजा फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:09 AM

शनिवारी रात्री दुबईहून आलेल्या चारपैकी दोन कॉलवर बोलणे झाले. त्याचे संभाषण पुढीलप्रमाणे आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंग प्रकरण की कंगनाचे चाहते

नरेश डोंगरे 

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीवरून सलग दोन दिवस फोन करून धमकी दिल्याच्या प्रकरणाने तपास यंत्रणांसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे फोन डी कंपनीकडून आले, ते सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आले, की कंगना रनौत प्रकरणात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांसोबतच राज्यातील तपास यंत्रणेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.दुबईहून फोन आल्यामुळे ते डी कंपनीकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. अभिनेत्री कंगना हिने मुंबई पोलिसांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी 'ज्यांना मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही. त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्यावरून सर्वत्र चर्चेचे रान पेटले आहे. त्यामुळे कंगनाच्या समर्थकांनी हे फोन केले असावे, असाही शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांचा संशय आहे. या संबंधाने कसून तपास केला जात आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांच्या मोबाईलवर जे फोन आले ते 'व्हॉईस कॉल इंटरनेट प्रोटोकॉल' (व्हीओआयपी) च्या माध्यमातून करण्यात आल्याचे अधिकारी सांगतात. इंटरनेटच्या माध्यमातून असे कॉल केले जातात. त्यामुळे त्याची आयडी स्पष्ट होत नाही. हा कॉल करणाऱ्याचा छडा लावण्याचे काम क्लिष्ट असल्याचेही अधिकारी सांगतात.शनिवारी रात्री दुबईहून आलेल्या चारपैकी दोन कॉलवर बोलणे झाले. त्याचे संभाषण पुढीलप्रमाणे आहे.कॉलर : ये अनिल देशमुखजी का नंबर है क्या?कोठेकर : नहीं,आप कौन बात कर रहे ...कॉलर : मुझे पता है, ये अनिल देशमुखजीकाही नंबर है...कोठेकर : नहीं, मै देशमुखजी का पीए बोल रहा हूं... आप कौन बोल रहे...?कॉलर : वो छोडिये, ये बताईये होम मिनिस्टरजी का ही नंबर है ना ...कोठेकर : मै उनका पीए बोल रहा हूं... आप नाम बताईये, कुछ मेसेज हो तो बताईए...कॉलर : नाम में क्या रखा है... मेरी उन से बात करवा दिजिए.कोठेकर : हां, करवा देता हूं, आप अपना नाम बताईये...कॉलर : मैं दुबई से बात कर रहा हूं. उनसे कहिए.. जरा संभल के रहे... नही तो ठीक नही होगा!कोठेकर यांच्याशी एक मिनिटे, ३४ सेकंद बोलणाऱ्या कॉलरने +६२७०५२७ या नंबरवरून फोन केला होता.रविवारी दुपारी १२. १५ वाजतासिव्हिल लाईन्समधील बंगल्याच्या लॅण्डलाइनवर फोन आला. हा फोन करणाऱ्याचा नंबर ९३१५७३७२८९ असून त्याचे नाव संजयसिंग ठाकूर असल्याचे समजते. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याKangana Ranautकंगना राणौतPoliceपोलिस